संभाजीनगर : महायुतीचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांना नुकतेच स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. निवडणुकांपूर्वीच त्यांचा भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्याशी वाद असल्याचं पाहायला मिळालं. तर, निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षातील नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत त्यांचे खटके उडाल्याचंही दिसून येत आहे. कारण, आज वाढदिवसानिमित्त व आमदारकीच्या विजयाबद्दल अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात भाषण करताना त्यांनी सगळंच काढलं. राजी, नाराजी, जिल्ह्यातील राजकारण, मंत्रिपद, एकनाथ शिंदे (Eknath Shinde), महायुती, पुढील अडीच वर्षे आणि मी पुन्हा येईन, असे म्हणत अब्दुल सत्तार यावर आपल्या भाषणातून बोलून दाखवलं. मंत्री असतांना अनेक सत्कार होत असतात पण मंत्री नसतानाच हा सत्कार आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांचे आभारही मानले. 


काही लोक धर्माच्या नावाने राजकारण करतात, काही लोक म्हणतात सिल्लोडला येणार, एकाला घरी बसवलं आता दुसरा येत आहे. पण, मी संभाजीनगरमध्ये येणार आणि गुंडगिरी सपंवणार, मंत्री असल्यावर कुणीही बोलणार असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. कुछ देर तक खामोशी है, फिर कानो मे शोर आयेंगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा तो दौर आयेगा.. अशी डायलॉगबाजीही सत्तार यांनी केली. काही लोक जसा नाला खडखड करतो, तसं खडखड करू लागले आहेत. पण, जोपर्यंत शिंदे साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्यांचाच राहणार, कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी तुमचा आदेशाचं पालन करणार, अजून देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास माझ्यावर आहे, अजित दादाचा आहे. पद येतात, जातात, असेही सत्तार यांनी म्हटलं. 


पुढील अडीच वर्षात काय हे सांगता येणार नाही


बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची आणि ती चर्चा वर्षभर राहायची. आज काही नाही, मी एक साधा कार्यकर्ता आहे, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या कार्यकर्त्यांची परतफेड करण्यासाठी मी कमी पडणार नाही. मला पाच वर्ष मंत्री पदाची संधी मिळाली, पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही. कारण राजकारणामध्ये त्या गोष्टी कधीही पूर्ण होत नाही. फक्त आश्वासन दिले जातात, मलाही त्याची जाणीव आहे, असे म्हणत पुढील मंत्रि‍पदावरही त्यांनी भाष्य केलं. 


मी पालकमंत्री होतो, तिथं महायुती जिंकली


माझ्या नेत्याने सर्वांना सांगितलं अडीच वर्ष हे राहतील,अडीच वर्षे ते राहतील, तुम्हाला थांबावं लागेल. पण, मी काम करायला कुठेही कमी पडणार नाही, मी चारवेळा मंत्री राहिलो. मी ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो,त्या त्या जिल्ह्यात सत्तेचा 100 टक्के विजय झाला आहे. मी धुळ्याचा पालकमंत्री असताना शंभर टक्के महायुती निवडून आली. हिंगोलीतही आले, मी संभाजीनगरचा पालकमंत्री राहिलो इथेही 100 टक्के महायुती निवडून आली. संभाजीनगर झाल्यावर मी पहिला पालकमंत्री ठरलो, असेही सत्तार यांनी म्हटले. 


हेही वाचा


दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं