18 % GS on Paratha : तुम्हाला पराठे खायला आवडत असतील तर यापुढे तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. गुजरातमधील अॅपेलाइट अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स्ड रुलिंग (एएआर/AAAR) विभागानं पराठ्यावर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. AAAR च्या मते, चपाती आणि पराठ्यामध्ये खूप फरक आहे. चपातीवर पाच टक्के जीएसटी आहे तर पराठ्यावर 18 टक्के जीएसटी लागेल. खाण्याच्या बहुतांश सामग्रीवर जीएसटीचा दर पाच टक्के आहे. पण काही खाद्यपदार्थाला विशेष श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्याच्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो. AAAR ने गुजरातमध्ये पराठ्यावर 18 टक्के जीएसटी लावला आहे. 


अहमदाबादमधील कंपनी वाडीलाल इंडस्ट्रीज (Vadilal Industries) यांनी पराठ्यावरील जीएसटी कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही कंपनी रेडी टू कूक (ready to cook) म्हणजेच फ्रोजन पराठे तयार करते. कंपनीच्या मते. चपाती आणि पराठ्यामध्ये जास्त अंतर नाही. दोन्ही पिठापासून तयार होतात. याची तयार करण्याची पद्धतही मिळतीजुळती आहे. त्यामुळे पराठ्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात यावा.  पण एएएआरनं वाडीलाल कंपनीचा दावा फेटाळून लावला आणि पराठ्यावर 18 टक्केच जीएसटी लागेल असे स्पष्ट केले. 


मागील अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स्ड रुलिंगच्या अहमदाबादमधील खंडपीठानं रेडी टू कूक म्हणजेच फ्रोजन पराठ्यावर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीनं याविरोधात एएएआरमध्ये याचिका दाखल केली होती. पण अॅपेलाइट अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स्ड रुलिंगने एएआरचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. अॅथॉरिटीने सांगितलं की, वाडीलाल कंपनी तयार करत असलेल्या पराठ्यामध्य 36 ते 62 टक्के  पीठ अथवा मैदा असतो. त्यासोबत यामध्ये बटाटा, मुळा आणि कांद्याचा समावेश असतो. त्याशिवाय पाणी, मीठ आणि तेलही असते. पण चपातीमध्ये फक्त पीठ आणि पाणी असते. 
 





विरोधाभासी निर्णय


याआधी महाराष्ट्रातील अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स्ड रुलिंगने (एएआर) पराठ्यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. पण केरळ आणि गुजरातमधील एएआरच्या मते, चपाती आणि पराठ्यात खूप अंतर आहे. त्यामुळे त्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात यावा, असे सांगण्यात आलं. तज्ज्ञांच्या मते, वेगवेगळ्या अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स्ड रुलिंगच्या निर्णायामुळे हे प्रकरण अधीक किचकट होऊ शकतं. जीएसटी परिषदेनं यावर तात्काळ निर्णय घ्यायला हवा. काही स्लॅबला एकत्र केल्यास हे प्रकरण सोपं हऊ शकतं.  काही रेस्टॉरंट अथवा हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेल्यानंतर जेवणाच्या बिलावर पाच टक्के जीएसटी लागतो. मग तुम्ही चपाती खा अथवा पराठा खा... त्यावरही पाच टक्के जीएसटी लागला जातो.