Byju's Layoff : देशातील सर्वात मोठी एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी बायजू (Byju) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च 2023 पर्यंत 5 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय Byju नं घेतला आहे. तर दुसरीकडे 10 हजार नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णयही कंपनीनं घेतला आहे. ही कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे.


10 हजार शिक्षकांना मिळणार नोकऱ्या  


कंपनी नवीन भागीदारांद्वारे परदेशात ब्रँड जागरुकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. याशिवाय, भारत आणि परदेशातील व्यवसायासाठी 10 हजार नवीन शिक्षकांची नियुक्ती करणार असल्याची माहिती 
बायजू कंपनीच्या सह-संस्थापक दिव्या गोकुळनाथ यांनी दिली. आम्ही संपूर्ण भारतात आमचा ब्रँड निर्माण केला आहे. आता मार्च 2023 पर्यंत अधिक नफा मिळवण्याची योजना आम्ही आखत आहोत. तसेच विपणन बजेट जास्तीत जास्त वाढवले ​​जाईल आणि खर्चाचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल अशी माहिती गोकुळनाथ यांनी दिली. नवीन योजनेमुळं कार्यक्षमता वाढण्यास आणि निकृष्ट गोष्टी टाळण्यास मदत होईल. आमचे हायब्रीड लर्निंग मॉडेल 'ट्यूशन सेंटर' आणि आमचे 'ऑनलाइन लर्निंग मॉडेल' जे बायजूचे क्लासेस किंवा आमचे 'लर्निंग अॅप' आहे. 


2021 मध्‍ये बायजूला 4 हजार 588 कोटी रुपयांचा तोटा


दरम्यान, मागील आर्थिक वर्षात बायजूला 4 हजार 588 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती देखील दिव्या गोकुळनाथ यांनी दिली. बायजूची संपूर्ण भारतात 200 हून अधिक सक्रिय केंद्रे कार्यरत आहेत. 2022 च्या अखेरीस ते 500 केंद्रांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहितीही दिव्या गोकुळनाथ यांनी दिली. आथिर्क वर्ष 2021 मध्‍ये बायजूला 4 हजार 588 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तेव्हापासून महसुलात मोठी घट झाल्याची माहितीही गोकुळनाथ यांनी दिली.


byju काय काम करते


Byju ही एक भारतीय बहुराष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे. ज्याचे मुख्यालय बंगळुरु इथं आहे. बायजू ही कंपनी 2011 मध्ये स्थापना केली होती. बायजू ही जगातील सर्वात मोठी शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे. बायजू हे अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देते. ज्याद्वारे मुले घरी बसून अभ्यास करु शकतात. बायजू हे अधिकृतपणे थिंक अँड लर्न नावाचे ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअप आहे. बायजू भारतात ऑनलाईन शिकवण्यात आघाडीवर आहे. बायजूने भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोमध्येही मुलांना शिक्षण देण्यास शिकवायला सुरुवात केली आहे.


FrontRow कंपनीनं 130 कर्मचाऱ्यांना केलं कमी


Edtech स्टार्टअप FrontRow ने देखील मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या कंपनीतील 75 टक्के कर्मचारी कमी केले आहेत. म्हणजे जवळपास 130 कर्मचाऱ्यांना कंपनीनं नारळ दिला आहे. या कपंनीमध्ये आता 40 जणांची टीम राहिली आहे. हा आमच्यासाठी एक कठीण निर्णय होता. पण आमचा व्यवसाय करण्याचा मार्ग चुकीचा  असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतल्याची माहिती फ्रंटरो सह-संस्थापक ईशान प्रीत सिंग यांनी सांगितली.


महत्त्वाच्या बातम्या:


ST Employee : एसटी महामंडळाचे 118 बडतर्फ कर्मचारी आजपासून पुन्हा सेवेत, सदावर्ते यांच्यासोबत जल्लोष


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI