एक्स्प्लोर

पंचकुला हिंसाचारप्रकरणी हनीप्रीतवर आरोप निश्चित होणार!

राम रहीमला बलात्कारप्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर पंचकुलामध्ये मोठा हिंसाचार झाला होता. याचप्रकरणी हनीप्रीतसह अन्य 15 आरोपींविरोधात आज पंचकुला कोर्टात सुनावणी होणार आहे.

हरियाणा : राम रहीमला बलात्कारप्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर पंचकुलामध्ये मोठा हिंसाचार झाला होता. याचप्रकरणी हनीप्रीतसह अन्य 15 आरोपींविरोधात आज पंचकुला कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटबाबत आज सुनावणीत चर्चा होणार आहे. हनीप्रीतसह अन्य आरोपी कोर्टात हजर राहणार हरियाणा पोलिसांनी दाखल केल्या चार्जशिटमध्ये जी कलमं लावली आहेत त्यांचा जर बचाव पक्षाकडून विरोध झाला नाही तर कोर्ट याप्रकरणी आजच आरोप निश्चित करु शकतं. या प्रकरणाची सुनावणी सकाळी 10 वाजता होणार आहे. या सुनावणीवेळी हनीप्रीतसह अन्य आरोपींनाही कोर्टात हजर केलं जाईल. हनीप्रीतवर देशद्रोहाचा आरोप हनीप्रीत सध्या अंबाला जेलमध्ये आहे. 28 नोव्हेंबरला हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतसह 15 जणांविरोधात चार्जशीट दाखल केलं होतं. या चार्जशीटमध्ये सर्व आरोपींना हिंसेच्या घटनेसाठी आरोपी ठरवण्यात आलं आहे. हनीप्रीतवर कट रचणं, देशद्रोह यासारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. बाबा राम रहीमला 2002च्या साध्वी बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर सिरसा, पंचकुला या शहरांसह हरियाणा, पंजाबमध्ये राम रहीमच्या कथित समर्थकांनी धुडगूस घातला होता. यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच लाखोंच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं. काय आहे संपूर्ण प्रकरण? एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती. डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं. जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी काही साध्वींचंही लैंगिक शोषण झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही. ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. 2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले. जुलै 2016 : खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते. जून 2017 : कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली. 25 जुलै 2017 :  सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकरुन लवकरच निकाल लावता येईल. 17 ऑगस्ट 2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली. 25 ऑगस्ट 2017 : बाबा राम रहीमला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं.  28 ऑगस्ट 2017 : 2002 मधील साध्वी बलात्कार प्रकरणी ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीमला वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

संबंधित बातम्या :

'बाबा राम रहिम जेलमध्ये ढसाढसा रडतो' राम रहीमचा मुलगा डेराच्या हजारो कोटी संपत्तीचा वारसदार! तुरुंगात बाबा राम रहीमचा दिनक्रम काय? VVIP ट्रिटमेंटची मागणी, कोर्टाने राम रहीमला झापलं राम रहीमने 300 साध्वींवर बलात्कार केला, माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट  10 वर्षे नव्हे, दोन बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा! हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निर्णय देणारे डॅशिंग जज : जगदीप सिंग! 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीमकडे आता पर्याय काय? Ram Rahim Rape Case : राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा बाबा राम रहीमचा फैसला, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी  हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा? न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार! राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं  गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?  व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला  बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली  बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू  भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन  अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?  कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात  राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट  बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Panchayat Elections : राजस्थान जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची लाट, 37 पैकी 27 जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता,राजधानी जयपूरमध्येही भाजपचा पराभव
काँग्रेसची राजस्थानात लाट, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव, मुख्यमंत्री शर्मांना धक्का 
Vantara : जन्मतःच पाय फ्रॅक्चर झालेल्या सात आठवड्यांच्या 'राजा' हत्तीच्या पिल्लाला जीवदान, आसाममधून थेट गुजरातमधील 'वनतारा'मध्ये एअरलिफ्ट
जन्मतःच पाय फ्रॅक्चर झालेल्या सात आठवड्यांच्या 'राजा' हत्तीच्या पिल्लाला जीवदान, आसाममधून थेट गुजरातमधील 'वनतारा'मध्ये एअरलिफ्ट
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Embed widget