पंचकुला (हरियाणा) : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिमची दत्तक मुलगी हनीप्रीतला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर हिंसा भडकावल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. हनीप्रीतला आज कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत पंचकुला कोर्टात हजर केलं. हनीप्रीत कोर्टात हजर होण्याआधी तिची बहिण आणि वकील प्रदीप आर्य न्यायालयात दाखल झाले होते.

हनीप्रीतला अखेर बेड्या, उद्या कोर्टात सादर करणार

हनीप्रीतला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. परंतु कोर्टाने तिला सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. निकालाचं वाचन सुरु असताना हनीप्रीत न्यायाधीशांसमोर हात जोडून उभी होती.

राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला होता. राम रहिमची जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर हनीप्रीत फरार होती. तिच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छाप टाकले. अखेर 38 दिवस पोलिसांना चकवा दिल्यानंतर मंगळवारी तिला बेड्या ठोकल्या.

हनीप्रीतवर नेमके आरोप काय?
राम रहीमला पळवून नेण्यासाठी कट रचल्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. पोलिसांच्या मते, 25 ऑगस्टला राम रहीम जेव्हा जेलमध्ये गेला तेव्हा हनीप्रीतनं काही गुंडांच्या मदतीनं हिंसाचार घडवून आणला. ज्यामध्ये अनेकांचे प्राणही गेले. तसेच या हिंसाचाराचा फायदा घेऊन राम रहीमला पळवून नेण्याच कटही तिने रचला होता. असा पोलिसांचा दावा आहे.

38 दिवसांनी अखेर हनीप्रीत जगासमोर, आज सरेंडर करण्याची शक्यता

हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा
हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. पंचकुलामध्ये हिंसा भडकावण्याच्या आरोपाखाली हनीप्रीतविरोधात सेक्टर-5 पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. साध्वींवरील बलात्कारप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राम रहीमला पोलिस कोठडीतून पळवण्याचा कट हनीप्रीतने रचला होता, असा आरोप आहे.

संबंधित बातम्या

38 दिवसांनी अखेर हनीप्रीत जगासमोर, आज सरेंडर करण्याची शक्यता

हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज


हनीप्रीत आणि राम रहीमचे अनैतिक संबंध, हनीप्रीतच्या पतीचा आरोप


हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती


पोलिसांना गुंगारा देणारी हनीप्रीत नेपाळमध्ये दिसली : सूत्र