एक्स्प्लोर

गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा पणाला

पणजी मतदारसंघात एकूण चार उमेदवार असले तरी प्रत्यक्ष निवडणूक दुरंगी अर्थात भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्यात होणार आहे.

पणजी (गोवा) :  पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी संपुष्टात आला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या बरोबरच सरकारचे भवितव्य पणाला लागलेले आहे. उद्या मतदान, 28 ऑगस्टला मतमोजणी दोन्ही मतदारसंघात मिळून 51 हजार मतदार 7 उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. आज दुपारी अधिकारीवर्गाने मतदानकेंद्रावर जाऊन यंत्रणा उभी केली. उद्या (बुधवार, 23 ऑगस्ट) रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार असून 28 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. पर्रिकरांसह राणेंची प्रतिष्ठा पणाला पणजी मतदारसंघात एकूण चार उमेदवार असले तरी प्रत्यक्ष निवडणूक दुरंगी अर्थात भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्यात होणार आहे. वाळपईतही एकूण 3 उमेदवार असले तरी भाजपचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्वजित राणे व काँग्रेसचे उमेदवार रॉय नाईक यांच्यात सामना रंगणार आहे. कुठल्या मतदारसंघात किती मतदार? पणजी मतदारसंघासाठी एकूण 30 मतदानकेंद्रांची स्थापना करण्यात आली असून वाळपईकरिता 46 मतदानकेंद्रे आहेत. पणजीत एकूण 22 हजार 196 मतदार असून त्यात पुरुष 10 हजार 640 तर 11 हजार 556 महिला मतदारांचा समावेश आहे. वाळपईत एकूण 28868 मतदार असून त्यात पुरुष 14 हजार 340 तर महिला 14 हजार 528 यांचा अंतर्भाव आहे. दोन्ही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषापेक्षा जास्त असून पणजीत हे प्रमाण 900 च्या आसपास आहे. वाळपईत 150 महिला मतदार अधिक आहेत. मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी निवडणुकीनिमित्ताने सोमवारी सायंकाळपासून कोरडे दिवस सुरू झाले असून ते मतदान होईपर्यंत चालू राहणार आहेत. पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठी बुधवार 23 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पणजी शहरातील अनेक मतदार चतुर्थीसाठी मंगळवारी 22 रोजीच आपल्या मूळ घरी जाणार असल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे. कारण पणजीतील अनेक मतदार चतुर्थीची तयारी करण्यासाठी मूळ घरी जातात. वाळपईमध्ये मात्र तशी शक्यता दिसून येत नाही. निवडणूक यंत्रण सज्ज अनेक ठिकाणी मतदानकेंदाची तयारी पूर्ण करण्यात येत असून काही ठिकाणी केंद्राबाहेर मंडप घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दुपारी निवडणूक अधिकारी मतदानयंत्र व इतर सामुग्री घेऊन मतदानकेंद्राकडे रवाना झाले आहोत. मतदान केंद्राबरोबर मतदारांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून मतदान करण्याकरिता मतदान यादीत नाव असणे व ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक ओळखपत्र, वोटरस्लीप किंवा इतर ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे. मतदानकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दोन्ही मतदारसंघासाठी मिळून एकूण 800 सरकारी कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात आले असून त्याशिवाय सुमारे 200 पोलीस मतदानकेंद्रावरील बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget