एक्स्प्लोर

बँक खात्याला पॅनकार्ड जोडणं बंधनकारक

नवी दिल्ली : जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या बँक खात्याला पॅन (परमनन्ट अकाऊंट नंबर) जोडला नसेल, तर 28 फेब्रुवारीपर्यंत अकाऊंटला पॅन जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करा. कारण आयकर विभागानेच तसे आदेश दिले आहेत. ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल, त्यांना फॉर्म-60 भरुन द्यावा लागेल. पॅन कार्ड न जोडल्यास काय कारवाई? काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी आयकर विभागाने पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा नियम लागू केला आहे. आयकर विभागाच्या अधिसूचनेत याबाबत कोणताही खुलासा नाही की, 28 फेब्रुवारीपर्यंत बँक खात्याला पॅन कार्ड न जोडल्यास काय कारवाई होईल. असं असलं तरी, सुरतमधील एका बँकेने पॅन कार्ड जोडले नसलेल्या अकाऊंटचे व्यवहार रोखले आहेत. ज्यांनी पॅन कार्ड जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली, त्यांचे व्यवहार सुरळीत केले जात आहेत. साधारणत: जन धन खाते, बेसिक अकाऊंट आणि विशेष रुपाने उघडले जाणारे टाईम डिपॉझिट वगळता सर्व बँक खात्यांसाठी आता पॅन बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, काही जुन्या बँक खात्यांना पॅन कार्ड जोडलेले नाहीत. जुने बँक खाती ज्यावेळी उघडली गेली, त्यावेळी पॅन कार्ड बंधनकारक नव्हतं. त्यामुळे अशा खात्यांमध्ये 50 हजार किंवा त्याहून अधिकच्या रकमेचा व्यवहार झाल्यास त्यांना फॉर्म-60 भरावा लागत असे. बँक आणि टपाल खात्यांमध्ये 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान बचत खात्यात अडीच लाख किंवा त्याहून अधिक रक्कम जमा झाली असल्यास, त्याची माहिती 15 जानेवारीपर्यंत द्यावी लागेल. शिवाय, चालू खात्यावर 12 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम जमा झाली असल्यास, तपशील द्यावा लागेल. नोटाबंदीआधीचा तपशीलही आयकर विभागाकडून विचारला जाणार आहे. हा तपशील विचारण्याचं कारण म्हणजे नोटाबंदीच्या आधी काळा पैसा खातेधारकाने आपल्या खात्यावर जमा केला आहे का, याची चौकसी आयकर विभाग करणार आहे. नोटाबंदीदरम्यान कमीशनवर रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे वृत्त समोर आल्यानंतर आयकर विभागने नोटाबंदी आधीच्या तपशीलाची चौकशी करण्याचेही ठरवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Embed widget