नवी दिल्ली : भारताने काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मंगळवारी बदला घेतला. भारतीय हवाई दलाने पाकच्या हद्दीत घुसून 350 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान बावचळला आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानी जवान एलओसीवरील रहिवासी परिसरात लपून भारतावर ग्रेनेड हल्ले करत आहेत. पाकिस्तानच्या ग्रेनेड हल्ल्यात भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यांना भारतानेदेखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे काही रेंजर्स ठार झाले आहेत.

काल पहाटे 3.30 वाजता भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. त्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानने सायंकाळी 6.30 वाजल्यापासून तब्बल 10 ते 12 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय सीमेच्या अलिकडच्या भागात तोफा आणि मिसाईल्सचा मारा केला. भारतीय जवानांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांच्या चौक्यांवर हल्ला केला. भारताच्या प्रत्युत्तरानंतर घाबरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी एलओसीजवळच्या रहिवासी भागात आसरा घेतला. याचदरम्यान भारतीय जवानांनी पाकिस्तानचे काही रेंजर्स ठार केले. काही इंग्रजी संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचे पाच जवान ठार झाले आहेत.

व्हिडीओ पाहा




भारतीय जवानांनी आजही त्यांची नितिमत्ता जपली. आपल्या जवानांनी केवळ पाकिस्तानच्या चौक्यांवरच हल्ला केला. लोकवस्तील पाकिस्तानी सैनिक लपले असल्याची माहिती असूनही भारतीय जवानांनी लोकवस्तीला या सर्व प्रकारापासून दूर ठेवले. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या 5 चौख्या उध्वस्त केल्या आहेत.

व्हिडीओ पाहा