एक्स्प्लोर

730 दिवसांची पगारी रजा द्या, रेल्वे अधिकाऱ्याचा अर्ज व्हायरल

सोशल मीडियावर विशेत: ट्विटरवर हनीफ गुल यांच्या सुट्टीचा अर्ज चर्चेचा विषय बनला आहे.

इस्लामाबाद : मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये कामकाजापासून विचारांपर्यंतचे वाद काही नवे नाहीत. हे फक्त भारतातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही दिसतं. शेजारी राष्ट्र पाकिस्तानमधील असाच एक प्रकार समोर आला आहे. तिथल्या एका रेल्वे अधिकाऱ्याने मंत्रालयाच्या सचिवाला पत्र लिहून सुट्टीसाठी अर्ज केला आहे. मजेशीर बाब म्हणजे अधिकाऱ्याने एक-दोन आठवडे नाही तर तब्बल 730 दिवसांची रजा मागितली आहे. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे सुट्टीचं कारण, जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. मोहम्मद हनीफ गुल नावाच्या या अधिकाऱ्याने 730 दिवसांच्या रजेसाठी अर्ज केला आहे. नवे रेल्वे मंत्री शेख राशिद अहमद यांच्यासोबत काम करणं अशक्य आहे, कारण त्याचं वर्तन योग्य नाही, असं त्यांनी अर्जात म्हटलं आहे. हनीफ गुल हे पाकिस्तान रेल्वेमध्ये ग्रेड-20 चे अधिकारी आहेत. हनीफ रेल्वेमध्ये मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. अर्जात त्यांनी लिहिलं आहे की, "नव्या मंत्र्यांची वृत्ती अव्यावसायिक असून, त्याचं वर्तन योग्य नाही. पाकिस्तानच्या नागरी सेवेतील एक सन्मानित सदस्य म्हणून मला त्यांच्या हाताखाली काम करणं शक्य नाही. त्यामुळे कृपया मला 730 दिवसांची रजा द्या." दरम्यान, निवडणुकांनंतर राशिद अहमद यांनी 20 ऑगस्ट 2018 रोजी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. सोशल मीडियावर विशेत: ट्विटरवर हनीफ गुल यांच्या सुट्टीचा अर्ज चर्चेचा विषय बनला आहे. पाकिस्तानात अनेकांनी त्यांचा हा अर्ज शेअर केला आहे. तर एवढ्या दिवसांच्या सुट्टीसाठी काहींनी हनीफ यांच्यावर टीकाही केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
West Bengal Election : ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
Embed widget