जम्मू काश्मीर : भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. आज सकाळी पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हद्दीत शिरल्यानंतर भारतीय वायुसेनेनं ही कारवाई केली आहे.


या घटनेनंतर सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या विमानांनी आज सकाळी ही भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला होता.



जम्मू काश्मीरच्या राजौरी परिसरात पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हवाई हद्दीत आली होती. मात्र भारतीय वायुसेनेच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला आहे. भारत सरकार किंवा वायुसेनेकडून याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.