मुंबईतल्या ब्रीच कँडी आणि हिंदुजा रुग्णालयात ते जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहेत. 'इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल एन्डो सर्जन्स'चे तेहम्तन हे संस्थापक अध्यक्ष आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल 2006 मध्ये त्यांना केंद्र सरकारने 'पद्मश्री' बहाल करुन सन्मानित केलं होतं. त्याच वर्षी क्वीन एलिझाबेथ द्वितीयच्या हस्ते सर्वोच्च ब्रिटीश पुरस्कारानेही तेहम्तन यांना
गौरवण्यात आलं.
तेहम्तन उद्वाडिया यांचा जन्म सिंध प्रांतातून आलेल्या पारसी आई-वडिलांच्या पोटी 15 जुलै 1934 रोजी मुंबईत झाला. सेंट मेरी मध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. मुंबई विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतली. केईएम रुग्णालयातून 1958 मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. 1960 मध्ये त्यांनी एमएस (पदव्युत्तर)
शिक्षण पूर्ण केलं.
शरद पवार यांना पद्मविभूषण, कोहली, साक्षी, दीपा मलिकला पद्मश्री
1993 ते 1998 या काळात त्यांनी 'इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल एन्डो सर्जन्स'चं अध्यक्षपद भूषवलं. 'सोसायटी ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया' आणि 'सोसायटी ऑफ एन्डोस्कोपिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन्स ऑफ एशिया'च्याही ते अध्यक्षपदी होते. तेहम्तन यांचे 90 आर्टिकल्स वैद्यकीय जर्नल्समध्ये छापून आले आहेत. लॅप्रोस्कोपिक कोलेसायटेक्टॉमी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी इन डेव्हलपिंग कंट्रीज ही दोन पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत.
2000 मध्ये तेहम्तन यांना डॉ. बी. सी. रॉय अवॉर्ड हा मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियातर्फे दिला जाणारा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च भारतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.