काँग्रेसनेही कटियार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कटियार यांनी प्रियांका गांधींवर असभ्य वक्तव्य केलं आहे. भाजपमध्ये महिलांना केवळ एक सुंदर वस्तू म्हणून पाहिलं जातं, या संस्कृतीचं कटियार यांनी दर्शन करुन दिलं आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे.
भाजपमध्ये महिलांचं मुल्यमापन त्यांची कार्यक्षमता, त्याग आणि मेहनत यांवर न करता त्यांच्या सौंदर्यावर केलं जातं, असंही सुरजेवाला म्हणाले. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
दरम्यान प्रियांका गांधी यांनीही कटियार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महिलांविषयी भाजपचा दृष्टीकोन कटियार यांनी दाखवून दिला आहे, अशा शेलक्या शब्दात त्यांनी टीका केली आहे.
काही नेत्यांची लज्जास्पद मानसिकता आहे. विनय कटियार यांनी प्रियांका यांच्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वडेरा यांनी केली आहे.