माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' यांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून उद्योजक अनिलकुमार नाईक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 'पद्मविभूषण'ने गौरव होणार आहे. लातूरमधील डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण बहाल करण्यात येणार आहे.
'एमडीएच मसाले'चे सर्वेसर्वा धरम पाल गुलाटी यांचाही पद्मभूषणने सन्मान होणार आहे. माऊण्ट एव्हरेस्ट सर करणारी पहिला महिला गिर्यारोहक बच्छेंद्री पाल हिचा पद्मभूषणने गौरव होत आहे.
मेळघाटात आदिवासी सामाजिक कार्यकर्ते स्मिता आणि रवींद्र कोल्हे अर्थात कोल्हे दाम्पत्याचा पद्मश्रीने गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नाटककार वामन केंद्रे यांचाही पद्मश्रीने सन्मान होणार आहे.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मनोज वाजपेयी, पार्श्वगायक शंकर महादेवन, दिग्गज अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. अभिनेते कादर खान यांनाही मरणोत्तर पद्मश्री प्रदान करण्यात येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी सुदाम काते, शास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद, राजकीय विश्लेषक नगीनदास संघवी यांचाही पद्मश्रीने सन्मान होणार आहे.
फूटबॉलपटू सुनिल छेत्री, क्रिकेटपटू गौतम गंभीर, कबड्डीपटू अजय ठाकूर यांचाही पद्मश्रीने गौरव होणार आहे. तर नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा, तालवादक शिवमणी यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण
1. अनिलकुमार नाईक - उद्योग
2. बाबासाहेब पुरंदरे - कला
3. तीजन बाई - कला
4. इस्माईल ओमर - (परदेशी नागरिक)
पद्मभूषण
1. डॉ. अशोक कुकडे - आरोग्य
2. कुलदीप नायर (मरणोत्तर) पत्रकारिता
3. बच्छेंद्री पाल - क्रीडा
4. धरमपाल गुलाटी - उद्योग
पद्मश्री
1. मनोज वाजपेयी - कला
2. सुनिल छेत्री (फुटबॉल) - क्रीडा
3. दिनयार काँट्रॅक्टर - कला
4. प्रभू देवा - नृत्य
5. गौतम गंभीर - क्रीडा
6. रोहिणी गोडबोले - विज्ञान
7. कादर खान (मरणोत्तर) - कला
8. सुदाम काते - आरोग्य
9. वामन केंद्रे - कला
10. रवींद्र आणि स्मिता कोल्हे - आरोग्य
11. शंकर महादेवन - कला
12. नगीनदास संघवी - शिक्षण
13. शब्बीर सय्यद - सामाजिक कार्य
14. आनंदन शिवमणी - कला
15. अजय ठाकूर (कबड्डी) - क्रीडा
संबंधित बातम्या :
प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना 'भारतरत्न'
बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण, कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री
पद्म पुरस्कार : देशातील आतापर्यंतचे 48 'भारतरत्न'
कोण आहेत नानाजी देशमुख?
कोण आहेत भूपेन हजारिका?
महाराष्ट्रातील 44 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर