नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. 855 पोलिस अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले असून महाराष्ट्रातील 44 पोलिसांचा यात समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मानकऱ्यांना गौरवण्यात येईल.
महाराष्ट्रातील चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरवण्यात येणार आहे. तर उर्वरित 40 पोलिसांना पोलिस पदक पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
राष्ट्रपती पुरस्कृत जीवन रक्षा पदक 48 बहादूर पोलिसांना देण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोन पोलिस अधिकाऱ्यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, दोन पोलिस अधिकाऱ्यांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि एकाला जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.
महाराष्ट्रातील 44 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 07:44 PM (IST)
महाराष्ट्रातील चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरवण्यात येणार आहे. तर उर्वरित 40 पोलिसांना पोलिस पदक पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -