एक्स्प्लोर

बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण, कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री

महाराष्ट्रातून उद्योजक अनिलकुमार नाईक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 'पद्मविभूषण'ने गौरव होणार आहे. लातूरमधील डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण बहाल करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 112 पद्म पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. चौघा जणांचा पद्मविभूषणने तर  14 जणांचा पद्मभूषणने सन्मान करण्यात आला आहे. 94 जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव होणार आहे. पद्म पुरस्कारार्थींमध्ये 21 महिलांचा समावेश आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' यांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून उद्योजक अनिलकुमार नाईक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 'पद्मविभूषण'ने गौरव होणार आहे. लातूरमधील डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण बहाल करण्यात येणार आहे. 'एमडीएच मसाले'चे सर्वेसर्वा धरम पाल गुलाटी यांचाही पद्मभूषणने सन्मान होणार आहे. माऊण्ट एव्हरेस्ट सर करणारी पहिला महिला गिर्यारोहक बच्छेंद्री पाल हिचा पद्मभूषणने गौरव होत आहे. मेळघाटात आदिवासी सामाजिक कार्यकर्ते स्मिता आणि रवींद्र कोल्हे अर्थात कोल्हे दाम्पत्याचा पद्मश्रीने गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नाटककार वामन केंद्रे यांचाही पद्मश्रीने सन्मान होणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मनोज वाजपेयी, पार्श्वगायक शंकर महादेवन, दिग्गज अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. अभिनेते कादर खान यांनाही मरणोत्तर पद्मश्री प्रदान करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी सुदाम काते, शास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद, राजकीय विश्लेषक नगीनदास संघवी यांचाही पद्मश्रीने सन्मान होणार आहे. फूटबॉलपटू सुनिल छेत्री, क्रिकेटपटू गौतम गंभीर, कबड्डीपटू अजय ठाकूर यांचाही पद्मश्रीने गौरव होणार आहे. तर नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा, तालवादक शिवमणी यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. पद्मविभूषण 1. अनिलकुमार नाईक - उद्योग 2. बाबासाहेब पुरंदरे - कला 3. तीजन बाई - कला 4. इस्माईल ओमर - (परदेशी नागरिक) पद्मभूषण 1. डॉ. अशोक कुकडे - आरोग्य 2. कुलदीप नायर (मरणोत्तर) पत्रकारिता 3. बच्छेंद्री पाल - क्रीडा 4. धरमपाल गुलाटी - उद्योग पद्मश्री 1. मनोज वाजपेयी - कला 2. सुनिल छेत्री (फुटबॉल) - क्रीडा 3. दिनयार काँट्रॅक्टर - कला 4. प्रभू देवा - नृत्य 5. गौतम गंभीर - क्रीडा 6. रोहिणी गोडबोले - विज्ञान 7. कादर खान (मरणोत्तर) - कला 8. सुदाम काते - आरोग्य 9. वामन केंद्रे - कला 10. रवींद्र आणि स्मिता कोल्हे - आरोग्य 11. शंकर महादेवन - कला 12. नगीनदास संघवी - शिक्षण 13. शब्बीर सय्यद - सामाजिक कार्य 14. आनंदन शिवमणी - कला 15. अजय ठाकूर (कबड्डी) - क्रीडा संबंधित बातम्या : प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना 'भारतरत्न' बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण, कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री पद्म पुरस्कार : देशातील आतापर्यंतचे 48 'भारतरत्न' कोण आहेत नानाजी देशमुख? कोण आहेत भूपेन हजारिका? महाराष्ट्रातील 44 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget