Onion Price : सध्या हळूहळू कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होताना दिसत आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर वाढल्यानं खिशाला झळ बसत असल्याचे ग्राहक म्हणत आहेत. अशातच वाढत्या कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं प्लॅन केला आहे. ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून केवळ 35 रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे.
सरकारकडून 35 रुपये किलो दरानं कांदा उपलब्ध
सध्या देशात थंडीच्या हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळं या काळात मुबलक प्रमाणात कांदा (Onion) उपलब्ध होत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं कांद्याचे दर हे प्रतिकिलो 50 रुपये तर काही ठिकाणी 60 रुपये किलोपर्यंत पोहोटले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने सर्वसामान्यांसाठी स्वस्त कांद्याची व्यवस्था करण्यासाठी पावले उचलली आहेत. ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून केवळ 35 रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. या उपक्रमांतर्गत, सध्या प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कांद्यासाठी भाजीपाला व्हॅन पुरवल्या जात आहेत.
उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी कमी दरानं कांद्याची विक्री
उत्तर प्रदेशातील (UP) वाराणसीमधील सोनभद्र, मिर्झापूर यासह अनेक ठिकाणी 35 रुपये किलो दरानं कांदा उपलब्ध होत आहे. वाराणसीमध्ये 25 ठिकाणी 35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री सुरु आहे. कमी दरानं कादा उपलब्ध होत असल्यानं ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कांद्याचे दर नियंत्रीत राहावेत म्हणून सरकार सातत्यानं काही ना काही उपाययोजना राबवत असेत. जेणेकरुन ग्राहकांचा रोष सरकारवर येणार नाही. दरम्यान, निवडणुकीच्या काळात कांद्याच्या धोरणाचा मोठा फटका सरकारला बसला होता.
कांद्याचे दर वाढतात त्यावेळीच सरकारचा हस्तक्षेप होतो, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान, एका बाजूला सरकारकडून कमी दरानं कांद्याची विक्री होत असली तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ज्यावेळी आमच्या कांद्याचे दर वाढतात त्यावेळी सरकार हस्तक्षेप करते आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर कसा पडेल यासाठी प्लॅन आखते असे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पडत असतात, त्यावेळी मात्र, सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसल्याची काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या: