गांदरबल (जम्मू-काश्मीर) - सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गुंड या भागात ही चकमक झाली.

या कारवाईनंतर परिसरात शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. आणखी दहशतवादी या भागात दडून बसलेले असल्याची माहिती मिळालेली आहे. दरम्यान, सोमवारी लष्कर ए तोयबाशी निगडीत 2 दहशतवाद्यांचा बंदिपोरामध्ये खात्मा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी आणि हत्यारे जप्त करण्यात आली.

या अगोदर श्रीनगर येथील मौलाना आझाद रोडवरील मार्केट परिसरात ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात पंधरा जण जखमी झाले होते. तसेच, जम्मू-काश्मीरमधील सोपार भागात पोलिसांना लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले होते. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपवल्यानंतर चिडलेल्या दहशतवाद्यांनी आता सर्वसामान्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या : -

श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू, 12 नागरिक गंभीर जखमी

कलम 370 रद्द झाल्यानंतर मोठा हल्ला, कुलगाममध्ये 5 बिगर काश्मिरी मजुरांची हत्या