एक्स्प्लोर

आग्रीपाड्यात आणखी एक ISI संशयित एजंटला बेड्या

मुंबई: उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका ISI एजंटला अटक केली आहे.  जावेद असं त्याचं नाव असून, त्याला आग्रापीड्यातून अटक करण्यात आली. यापूर्वी एटीएसने फैजाबाद आणि मुंबईतून दोन पाकिस्तानी गुप्तहेर आफताब अली आणि अल्ताफ कुरेशी यांना अटक केली होती. यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने काल नागपाड्यातून आयएसआय एजंट अल्ताफ कुरेशीला अटक केली होती. त्याच्याकडे तब्बल 70 लाख रुपये सापडले होते. त्यानंतर आज त्याचा साथीदार जावेद यालाही बेड्या ठोकल्या. अल्ताफच्या चौकशीतूनच जावेदला पकडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जावेदला पाकिस्तानने पैसे जमा करण्याचं काम सोपवलं होतं. त्याच्या सांगण्यावरुनच अल्ताफ कुरेशीनं खात्यात पैसे जमा केले होते. ats-up-1-580x395 यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने आफताब आणि अल्ताफची कसून चौकशी केली. त्यादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी मुंबईतील आग्रीपाडा भागात छापेमारी केली. तिथेच या दोघांचा साथीदार जावेदला अटक करण्यात आली. जावेदनेच पाकिस्तानच्या सांगण्यावरुन आफताबच्या खात्यात पैसे भरल्याचे पुरावे मिळाले आहेत. अल्ताफ कुरेशी हा आयएसआयसाठी हवाला ऑपरेटर म्हणून काम करायचा. उत्तर प्रदेशातील फैजाबादमधून अटक केलेला आयएसआय संशयित अफताब अली यालाही अल्ताफ कुरेशी पैसे पुरवायचा, अशी माहिती मिळते आहे. दोन्ही गुप्तहेर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. दरम्यान, आफताब अलीने पाकिस्तानात जाऊन आयएसआयचं ट्रेनिंग घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्याजवळ संशयित कागदपत्र, काही नकाशे, दहशतवादी साहित्य आणि अनेक चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही, LPG च्या उत्पादनातही 28 टक्क्यांची वाढ, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती 
देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही, LPG च्या उत्पादनातही 28 टक्क्यांची वाढ, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती 
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
LPG Cylinder Booking Rule : गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला, ग्रामीण भागात 25 नव्हे तर 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग, कालावधी दुप्पट
गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला, ग्रामीण भागात 25 नव्हे तर 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग, कालावधी दुप्पट

व्हिडीओ

Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report
Indian Oil Tank Return : इराणला तुरी, गाठली मुंबापुरी, कच्चं तेल घेऊन जहाज मुंबईत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले

Embed widget