नवी दिल्ली : 'एनडीटीव्ही' चॅनलवर एका दिवसाची बंदी घातल्यानंतर सरकारने आणखी दोन चॅनलवर बंदीची कारवाई केली आहे. 'न्यूज टाईम आसाम' आणि 'केअर वर्ल्ड टीव्ही' चॅनलवर ही कारवाई करण्यात आली आहे.


'न्यूज टाईम आसाम'वर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 9 नोव्हेंबरला एका दिवसासाठी बंदी घालण्यात आली. तर 'केअर वर्ल्ड चॅनल'वर आक्षेपार्ह माहिती दिल्याबद्दल तब्बल 7 दिवस चॅनल बंद ठेवण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत.

याआधी एनडीटीव्हीलाही पठाणकोट एअर बेसवर झालेल्या हल्ल्याचे अतिसंवेदनशील आणि अतिप्रमाणात कव्हरेज केल्याने प्रक्षेपण एक दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

पठाणकोट हल्ला: एका आघाडीच्या हिंदी चॅनलवर एका दिवसाची बंदी


बंदीबाबत एनडीटीव्हीचं स्पष्टीकरण जसंच्या तसं