नवी दिल्ली : महागाईचे चटके सोसत असलेल्या जनतेला पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांना सामोरं जावं लागणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लीटर 89 पैसे, तर डिझेल प्रति लीटर 86 पैसे महाग झाले आहेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.
याआधी गेल्या महिन्यात 16 ऑक्टोबरला पेट्रोलचे दर प्रति लीटर 1.34 रुपये, तर डिझेलचे दर प्रति लीटर 2.37 रुपये महाग झाले होते. त्यामुळे अवघ्या 15 ते 20 दिवसांच्या कालावधीतच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर त्याआधी 16 सप्टेंबरलाही दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली होती.
कच्च्या तेलातील चढ-उताराच्या आधारावर घरगुती ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्वस्त-महाग करत असतात.