On this day in history March 26  : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 26 मार्च रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या.  ‘आधुनिक मीरा’म्हणून ओळखले जाणाऱ्या महादेवी वर्मा यांचा आज जन्म झाला होता. ‘आधुनिक मीरा’म्हणून ओळखले जाणाऱ्या महादेवी वर्मा यांचा आज जन्म झाला होता. ब्लादिमिर पुतिन यांची 26 मार्च 2000  रोजी रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


‘आधुनिक मीरा’महादेवी वर्मा यांचा जन्म -


‘आधुनिक मीरा’म्हणून ओळखले जाणाऱ्या महादेवी वर्मा यांचा आज जन्म झाला होता. महादेवी वर्मा, एक भारतीय लेखिका, कार्यकर्त्या आणि हिंदी साहित्यातील प्रमुख कवयित्री यांचा जन्म 26 मार्च 1907 रोजी उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे झाला. महादेवी यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याची आवड होती. वयाच्या 7 व्या वर्षीच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. जेव्हा महादेवीचा जन्म झाला तेव्हा त्या कुटुंबाची सर्वात प्रिय मुलगी बनल्या होत्या. त्यांच्या  जन्म माता राणीच्या कृपेने झाला होता आणि त्यामुळे महादेवीवर तिच्या कुटुंबाचे खूप प्रेम होते. महादेवीचे नाव तिच्या आजोबांनी ठेवले होते. दोन भावांमध्ये ती एकुलती एक बहीण होती. महादेवी वर्मा या केवळ प्रसिद्ध कवयित्रीच नाहीत तर समाजसुधारकही होत्या. महिलांना त्यांचे पूर्ण हक्क मिळावेत यासाठी महादेवी वर्मा यांनी अनेक महत्त्वाची आणि क्रांतिकारी पावले उचलली होती. माहितीसाठी सांगतो की, महादेवी वर्मा यांना आधुनिक काळातील मीराबाई असे संबोधले जात होते, कारण त्या त्यांच्या कवितांमध्ये प्रियकरापासून विभक्त झाल्यानंतरचे दुःख आणि वेदना अतिशय भावनिक पद्धतीने मांडत होत्या. 


बांगलादेशचा स्वातंत्र्य दिवस -


आज बांगलादेशमध्ये स्वातंत्रा दिवस साजरा केला जातोय. आजच्याच दिवशी 1971 मध्ये बांगलादेशने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते. 26 मार्च 1971 रोजी बांगलादेश दक्षिण आशियाई देशाचा सदस्य झाला होता. भारताच्या मदतीमुळे बांगलादेश स्वातंत्र झाला होता.  मुजीबूर रहमान यांनी 26 मार्च रोजी 1971 रोजी बांगलादेश स्वातंत्र झाल्याची घोषणा केली होती. मुजिबुर रहमान बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष व  पहिले पंतप्रधान होते. मुजिबुर रहमानला बंगबंधू नावानेही ओळखले जाते. मुजीबूर रहमान यांच्या भडकाऊ भाषणामुळेच पाकिस्तानचे दोन तुकडे झाले अन् बांगलादेशची निर्मिती झाली होती. 


पोलिओच्या लसीचा शोध -


1953 मध्ये अमेरिकेचे शास्त्रज्ञ डॉ जोनास साल्क यांनी पोलिओच्या नवीन लसीचा शोध घेतल्याची घोषणा केली. तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात पोलिओ लस द्यावी लागते. या लसीमध्ये जिवंत विषाणू नसल्याने लस दिलेल्या व्यक्तीमध्ये लसीमुळे प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. भविष्यकाळात पोलिओ विषाणूशी संपर्क आल्यानंतर रुग्णाचा पोलिओपासून बचाव होतो.


पुतिन रशियाचे अध्यक्ष झाले


रशियाचे सर्व शक्तिमान नेते ब्लादिमिर  पुतिन दोन दशकांपासून राष्ट्राध्यक्ष आहेत. ब्लादिमिर पुतिन यांची 26 मार्च 2000  रोजी रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून आजतागत म्हणजेच जवळपास 23 वर्षांपासून पुतिन रशियाचे अध्यक्षपदी कायम आहेत. 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.  ब्लादिमिर पुतिन हे सर्वप्रथम 2000 साली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. त्यानंतर चार वर्षाच्या सलग दोन टर्म सत्तेत राहिल्यानंतर 2008 साली त्यांची जागा मेदवेदेव यांनी घेतली. त्यावेळी मेदवेदेव यांनी पुढच्या राष्ट्राध्यक्षपदाची टर्म सहा वर्षाची करण्यासाठी घटनेत दुरुस्ती केली. यानुसार, 2012 साली पुन्हा पुतिन हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. 2018 साली पुन्हा एकदा, चौथ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर पुतिन राष्ट्राध्यक्ष बनले. 


बाबुराव बागूल यांची स्मृतीदिन - 


आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणेारे बाबुराव बागूल यांचा आज स्मृतीदिवस आहे.  26 मार्च 2008 मध्ये त्यांचे नाशिकमध्ये निधन झाले होते. मी जात चोरली होती,
मरण स्वस्त होत आहे या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती आहेत. त्यांच्या कथा व कादंबऱ्या या गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांचं व वेदनांचं वर्णन करणारे आहेत. स्त्रीप्रधान कथालेखन हा देखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे सूड कथेमध्ये बाबुराव बागुल यांनी वाडी वस्तीवरील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचं चित्रण केलेला आहे.


विक्रम राठोड यांचा जन्म -
भारतीय क्रिकेटपटू विक्रम राठोड यांचा आज 1969 मध्ये जन्म झाला होता. त्यांनी भारतासाठी सात वनडे आणि सहा कसोटी सामने खेलळे आहेत. कसोटीत त्यांनी 131 तर वनडे 193 धावा केल्या आहेत. 1996 मध्ये त्यांनी टीम इंडियात पदार्पण केले होते. 


1910  :  औंध संस्थानातील कुंडमधील माळावर लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला आजच्या दिवशी सुरुवात केली होती.  पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले. 


1942 : इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.  


1972 : तत्कालीन राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलनाचे उद्घाटन केले. 


1973 : गूगलचे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म 


1973 :  200 वर्ष परंपरा मोडीत काढत लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये महिलांना नोकरी मिळण्यास सुरुवात झाली.  


1975 : जैविक शस्त्रसंधी अस्तित्वात आली.


2012 : माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस  यांचे आजच्याच दिवशी 2012 मध्ये निधन झाले होते.  


2020 : कोरोना विषाणूमुळे जगभरातील मृताची संख्या 21 हजारांवर गेली. तर युरोपमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  2,50,000 इतकी झाली.