Rahul Gandhi Disqualification: सगळ्याच चोरांचं नाव मोदी कसं? राहुल गांधींनी कर्नाटकातील कोलार या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी हे वक्तव्य केलं आणि आज त्याच वक्तव्यावरून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. एका मोदी आडनावाच्या आमदाराने राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा खटला भरला आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली. तसं पाहिलं तर गेल्या आठ-दहा वर्षांपासून 'मोदी' या नावामुळे काँग्रेस सातत्याने राजकीयदृष्ठ्या अडचणीत येत आहे. मोदींच्यामुळेच काँग्रेसची केंद्रातील सत्ता तर गेलीच, पण अनेक राज्यातील सत्ताही गेली. मोदींमुळेच राहुल गांधींचे पंतप्रधानपदाचे स्वप्न धुळीला मिळालं आणि आता तर खासदारकीही गेली. पण गुजरातमध्ये असलेल्या या 'मोदी' नावाच्या समुदायाचा इतिहास माहिती आहे का? हा समुदाय नेमका कुठला आणि तो गुजरातमध्ये कसा आला?
Who Are Modis : कोण आहेत मोदी?
मोदी केवळ आडनाव नाही तर गुजरातमधील एक समूदाय आहे. या समुदायाचं मूळ हे उत्तर भारतातील नोमॅडिक ट्राईब म्हणजेच भटक्या जमातीमध्ये आढळते. म्हणूनच नरेंद्र मोदींनी 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीवेळी, वाराणसीतून लढताना आपलं मूळ उत्तर भारतातील असल्याचं सांगितलं होतं. पंधराव्या ते सोळाव्या शतकाच्या दरम्यान हा समूदाय गुजरातमध्ये आला. गुजरात व्यतिरिक्त हा समुदाय राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, झारखंड या ठिकाणी आहे.
Meaning of Modi Name : मोदी आडनावाचा नेमका अर्थ काय?
मोदी या शब्दाचा गुजराती अर्थ म्हणजे किराणा मालाचा दुकानदार. गांधी आणि अंबानी या प्रसिद्ध आडनावाचा अर्थही तोच आहे.
तेल निर्मितीचा व्यवसाय आणि व्यापार
गुजरातमध्ये आलेल्या मोदी समूदायाचा मूळ व्यवसाय हा भुईमुगापासून तेल निर्मितीचा आहे. या मोदी समुदायाचेही दोन प्रकार पडतात. एक म्हणजे मोध घांची (Modh Ghanchi) आणि दुसरा म्हणजे तेली घांची (Teli Ghanchi). हे दोन्ही प्रवर्ग व्यापारी समुदायातील आहेत.
मोध घांची यांना बनिया असंही म्हटलं जातं. हा प्रकार हिंदू आणि मुस्लिम धर्मांमध्येही आढळतो. देशात जेव्हा ओबीसी समुदायाला आरक्षण (OBC Reservation) देण्यात आलं.त्यावेळी या समुदायाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात आला होता आपल्या आजूबाजूचे छोटे-छोटे दुकानदार, तेल विक्रेते, चहा पावडर विक्रेते हे मोध घांची या समुदायातील आहेत.
यातील दुसरा प्रकार म्हणजे तेली घांची. हा समूदाय देखील खाद्यतेल विक्रेता, घरगुती वस्तू विक्रेता, किराणा मालाचा विक्रेता आहे. या समुदायाला ओबीसी प्रवर्गांतर्गत आरक्षण देण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोध घांची या समूदायाचे आहेत. आता याच 'मोदीं'वर टीका केल्याने राहुल गांधी अडचणीत आले आहेत. थोडक्यात काय तर, मोदी आडनावावर नव्हे तर मोदी समुदायावर टीका केल्याने राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा :