12 September In History : मिहीर सेन यांनी 12 सप्टेंबर 1966 रोजी पहिल्यांदा डारडेनेल्स सामुद्रधुनी पार करून इतिहास रचला. त्यामुळेच 12 सप्टेंबर हा दिवस देशाच्या इतिहासात महत्वाचा दिवस मानला जातो. मिहिर सेन हे लांब पल्ल्याचे जलतरणपटू होते. इंग्लिश चॅनेल ओलांडून आपल्या लांब पल्ल्याच्या जलतरण मोहिमेची सुरुवात करणाऱ्या मिहिर सेन यांनी आपल्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने महासागर ओलांडण्यात यश मिळवले. डारडेनेल्स जसामुद्रधुनी ओलांडणारे ते जगातील पहिले जलतरणपटू होते. शिवाय मिहीर सेन हे पाच खंडातील सात समुद्र पार करणारे जगातील पहिले व्यक्ती होते. 16 नोव्हेंबर 1930 रोजी पुरुलिया पश्चिम बंगाल येथे जन्मलेल्या मिहिर सेन यांना भारत सरकारने 1959 मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले होते. याबरोबरच 1967 मध्ये त्यांच्या धाडसी आणि अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 12 सप्टेंबर हा दिवस इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार आहे. आच्याच दिवशी पहिल्या टाइपरायटरच्या विक्रीला सुरूवात झाली. शिवाय आजच्या दिवशी सीरियाची राजधानी दमास्कस येथील अमेरिकन दूतावासावर हल्ला  केला. 


1873 : पहिल्या टाइपरायटरची विक्री सुरू झाली 


12 सप्टेंबर 1873 रोजी पहिल्या व्यावसायिक टाइपरायटरची  विक्री सुरू करण्यात आली. 


1928: फ्लोरिडामध्ये एका भीषण वादळात 6000 लोकांचा मृत्यू झाला.


फ्लोरिडा या देशात 12 सप्टेंबर 1928 रोजी भीषण वादळ आले होते. या वादळात तब्बल 6000 लोकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो लोक जखमी झाले होते. 


1944 : अमेरिकन सैन्याने पहिल्यांदा जर्मनीत प्रवेश केला.


दुसरे महायुद्ध संपल्यापासून युरोपमधील अमेरिकेच्या संरक्षण रणनीतीचा जर्मनी महत्त्वाचा भाग आहे. युद्ध संपल्यानंतर जर्मनी 10 वर्षे मित्र राष्ट्रांच्या ताब्यात होती आणि अमेरिकन सैन्य त्याचा भाग होते. सैन्याची संख्या हळूहळू कमी होत असली, तरी अमेरिकन सैन्य अजूनही येथे आहे. मध्यंतरीच्या दशकांत अमेरिकन सैन्याने जर्मनीतही अनेक शहरे बांधली. 12 सप्टेंबर 1944 रोजी अमेरिकन सैन्याने प्रथम जर्मनीत प्रवेश केला होता. 


1959 : तत्कालीन सोव्हिएत युनियनचे रॉकेट 'लुना 2' चंद्रावर पोहोचले


लुना 2 हे सोव्हिएत युनियनच्या लुना प्रकल्पांतर्गत प्रक्षेपित केलेले दुसरे अंतराळयान होते. ते चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचले आणि चंद्रावर पोहोचणारे पहिले मानवनिर्मित वस्तू असल्याचे मानले जाते. हे अंतराळयान 12 सप्टेंबर 1959 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. 


1966: भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने डारडेनेल्स सामुद्रधुनी पोहून पार केले.


मिहीर सेन यांनी 12 सप्टेंबर 1966 रोजी पहिल्यांदा डारडेनेल्स सामुद्रधुनी पार करून इतिहास रचला. त्यामुळेच 12 सप्टेंबर हा दिवस देशाच्या इतिहासात महत्वाचा दिवस मानला जातो. मिहिर सेन हे लांब पल्ल्याचे जलतरणपटू होते. इंग्लिश चॅनेल ओलांडून आपल्या लांब पल्ल्याच्या जलतरण मोहिमेची सुरुवात करणाऱ्या मिहिर सेन यांनी आपल्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने महासागर ओलांडण्यात यश मिळवले. डारडेनेल्स सामुद्रधुनी ओलांडणारे ते जगातील पहिले जलतरणपटू होते. शिवाय मिहीर सेन हे पाच खंडातील सात समुद्र पार करणारे जगातील पहिले व्यक्ती होते. 16 नोव्हेंबर 1930 रोजी पुरुलिया पश्चिम बंगाल येथे जन्मलेल्या मिहिर सेन यांना भारत सरकारने 1959 मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले होते. याबरोबरच 1967 मध्ये त्यांच्या धाडसी आणि अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 


1968 : अल्बेनियाने वरसाय करारातून माघार घेण्याची घोषणा केली 


वरसाय करार संघटना हा अधिकृतपणे मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहाय्याचा करार आहे आणि याला  “वरसाय करार” (Warsaw Pact in Marathi) म्हणून ओळखला जातो. शीत युद्धा (Cold War) दरम्यान मे 1955 मध्ये सोव्हिएत युनियन (Soviet Union) आणि मध्य आणि पूर्व युरोप मधील सात इतर ईस्टर्न ब्लॉक समाजवादी प्रजासत्ताक (Eastern Bloc socialist republics of Central) यांच्यात वरसाय पोलंड येथे स्वाक्षरी केलेला हा सामूहिक संरक्षण करार होता. अल्बेनियाने या करारातून माघार घेण्याची घोषणा केली होती.  


1991: स्पेस शटल STS 48 अंतराळात सोडण्यात आले.


स्पेस शटल STS 48 हा 12 सप्टेंबर 1991 रोजी अंतराळात सोडण्यात आले. 


2001 : अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्धाची घोषणा केली.


2006: सीरियाची राजधानी दमास्कस येथील अमेरिकन दूतावासावर हल्ला.


2012: Apple ने iPhone 5 आणि iOS 6 लाँच केले.