मुंबई: भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या मुद्दयावर रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आता याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. सगळ्यात आधी देशाचा विचार व्हायला हवा. त्यानंतर कला आणि संस्कृतीचा.
याबाबत बोलताना अंबानी म्हणाले की, 'मी एका गोष्टीबाबत अगदी ठाम आहे की, माझ्यासाठी माझा देश पहिला आहे. मी काही बुद्धीजीवी व्यक्ती नाही. त्यामुळे मला या गोष्टी समजत नाही. पण सर्व भारतीयांप्रमाणणे माझ्यासाठी भारत पहिला आहे.'
कार्यक्रम 'ऑफ द कफ'मध्ये पाकिस्तानी अभिनेता आणि अन्य कलाकारांबाबत प्रेक्षकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अंबानींनी आपलं उत्तर दिलं. याप्रमाणेच त्यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही यापुढे राजकारणात उतरणार का? त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात 'नाही' असं उत्तर दिलं. 'मी राजकारणासाठी तयार झालेलो नाही.' असं ते म्हणाले.


पाकिस्तानी कलाकार बंदीचं नेमकं प्रकरण काय?
18 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या तळावर हल्ला केला. यामध्ये भारताचे 19 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं 29 सप्टेंबरला केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 40 दहशतवाद्यांना कंठस्नान घालून त्यांचे अड्डे उद्धवस्त केले.
या घटनेनंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना जोरदार विरोध केला. त्यांनी भारत सोडून पाकिस्तानात जावं नाहीतर मनसे स्टाईलनं त्यांचा समाचार घ्यावा लागेलं अशी मनसेनं भूमिका घेतली होती. त्यानंतर महिरा खान आणि फवाद खान यांनी भारतातून काढता पाय घेतला.
तसंच पाकिस्तानी कलाकार असलेल्या 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' यांच्या प्रदर्शनालाही विरोध करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

'ऐ दिल..' प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका

मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप

माहिरा खानची 'रईस'मध्ये रिप्लेसमेंट नाही, निर्मात्याचे संकेत


पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, थिएटर मालकांचा निर्णय

सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज : अमिताभ

VIDEO: सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांवर अक्षय भडकला!

सलमान खानवरील टीकेला सलीम खान यांचं उत्तर

बॉलिवूड कुणाच्या बापाचं नाही, फवाद खान बरळला

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं भारतातून गुपचूप पलायन?

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका

चित्रपट क्षेत्रात जगभरातल्या सर्वांना जागा दिली पाहिजे: सैफ अली खान

पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंद

अभिनेता सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका

सलमानकडून पाक कलाकारांचं समर्थन, मनसेकडून फक्त निषेध!

सलमानला धंदा दिसतो, शहिदांचं बलिदान नाही, राज ठाकरेंचा घणाघात

फोटो: सलमानच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये उभी फूट 

सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडून ठेवावं: शिवसेना