दिल्लीत अशोक चव्हाण-राहुल गांधी भेट, स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील, मोहन प्रकाशही उपस्थित
-----------------
कोपर्डी प्रकरण: आरोपींसाठी ॲड. योव्हान मकासरे यांची नियुक्ती, जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ या आरोपींच्या वतीने मकासरे वकील म्हणून कामकाज पाहणार
-----------------
पुणे : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरण, पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांच्या आश्वासनानंतर शेळके कुटुबीयांचा आमरण उपोषणाचा निर्णय मागे
-----------------
अहमदनगर : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोपर्डीत दाखल, घटनास्थळाची पाहणी करणार, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार
-----------------
मुंबई - चिंचपोकळीजवळ यार्डात रिकाम्या लोकल ट्रेनचा एक डबा रूळावरून घसरला, मुंबई सीएसटीकडे जाणारी फास्ट वाहतूक दादरपासून स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली. करीरोड - चिंचपोकळी दरम्यान 15 डब्ब्यांची लोकल अडकली. फास्ट वाहतूक विस्कळीत
-----------------
मनसे नगरसेवक अशोक सातभाई शिवसेनेत, भुजबळ समर्थक शिवाजी चुंबळे पत्नीसह आज शिवसेनेत प्रवेश करणार
मुंबईत कफ परेडच्या मेकर टॉवरमधील आग आटोक्यात, दोघांचा होरपळून मृत्यू
हेडलाईन्स
----------------
मुंबईत कफ परेडमध्ये मेकर टॉवरच्या 21व्या मजल्यावर मोठी आग, अग्निशमन दल घटनास्थळी
------------------
1 भुवनेश्वरच्या सरकारी रुग्णालयातील आयसीयूमध्ये भीषण आग, 22 जणांचा होरपळून मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक
------------------------
2 राज्यातील नगरपालिकांचं बिगुल वाजलं, 212 नगरपालिकांचा 4 टप्प्यात निकाल, 27 नोव्हेंबरपासून मतदान
---------------------
3 खड्डे बुजवण्याची डेडलाईन तोंडावर असताना पालिका कर्मचारी क्रिकेटमध्ये दंग, जी वॉर्डच्या कर्मचाऱ्यांची मौजमजा कॅमेऱ्यात, मुंबईकरांच्या डोक्यात तिडीक
---------------
4 'जिभेला लगाम घाला'... बडोले यांना सेनेचा सल्ला, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राजकुमार बडोले यांच्यावर तीव्र शब्दांत टीका
------------------
5 न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरमध्ये मराठा समाजाचा मोर्चा, परभणीत दलित अॅट्रॉसिटी समर्थनात दलितांचा एल्गार, तर मुस्लिम बांधव आरक्षणासाठी आज रस्त्यावर उतरणार
-------------------
6 संघाच्या शिकवणीमुळे सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेऊ शकलो, अहमदाबादमधील कार्यक्रमात मनोहर पर्रिकरांचा दावा
---------------------
7 मुंबई विमानतळावरील अनेक विमानांची उड्डाणं रद्द, धावपट्टीवरील दुरुस्तीच्या कामामुळं येत्या दोन महिन्यात २१०० उड्डाणं रद्द केली जाणार
-----------------
8 मल्टिप्लेक्सच्या काचा महाग असतात हे लक्षात ठेवा, मनसेचं मल्टिप्लेक्सचालकांना पत्र, ए दिल है मुश्कील आणि रईसच्या प्रदर्शनाला विरोध
----------------------
एबीपी माझा वेब टीम