L. Murugan on Yoga Day 2022 : दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी देखील जगभरात 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. योग दिनाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त देशभरातील 75000 हून अधिक तरुण योगासने करणार असल्याची माहिती मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली. कन्याकुमारी इथे विवेकानंद केंद्राच्या मैदानावर योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळं संयुक्त राष्ट्रांनी 21 डिसेंबर 2014 रोजी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्या वर्षापासून गेली आठ वर्षे आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी साजरा केला जातो, असे मुरुगन यांनी सांगितले. भारत देश यावर्षी स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहे. विविध मंत्रालये आणि विभागांद्वारे योग दिनाचा उलटगणती कार्यक्रम 75 दिवसांपासून आयोजित केला जात आहे.
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयानं योग दिवस उलटगणती कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या देशात सुरु झालेल्या योगचे आता जगभरात पालन केले जात आहे. रोज योगासन करुन तरुण निरोगी राहू शकतात असे मुरुगन यांनी यावेळी सांगितलं.दरम्यान, येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील 75000 हून अधिक तरुण योगासने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
देशभरातल्या 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा केला जाणार योगा दिवस
योग दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बदलत्या जीवनशैलीत आरोग्यासाठी वरदान असलेल्या प्राचीन भारतीय योग चिकित्सेला संपूर्ण जगाने स्वीकारलं आहे. यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशातल्या 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा होणार आहे. नागपूर शहरात कस्तुरचंद पार्कवर यानिमित्ताने मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सन 2015 पासून 21 जून हा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 21 जून 2022 ला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्याने आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे. देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या 'झिरो माईल्स 'च्या नागपूरचीही निवड झाली आहे. देशभरात आयुष मंत्रालयामार्फत 75 प्रसिद्ध स्थळांवर योग दिन आयोजित करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या: