Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सुरू असलेला चढ-उतार, ओमायक्रॉन (Omicron)व्हेरियंटचे सावट या पार्श्वभूमीवर भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. मागील काही दिवसांपासून इंधन कंपन्यांनी इंधन दरात कोणतीही वाढ केली नाही. जवळपास महिनाभरापासून इंधन कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहेत.
मुंबईत पेट्रोलचे (Petrol-Diesel Price In Mumbai)पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. डिझेलचा दर 94.14 इतका आहे. चेन्नईमध्ये 101.40 रुपये प्रति लिटर, राजधानी दिल्लीत 95.41 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये 104.67 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. तर, दिल्लीत डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लिटर असे असून चेन्नईत 91.43 रुपये, कोलकातामध्ये 89.79 रुपये प्रति लिटर इतका आहे. दिल्ली सरकारने पेट्रोलवरील वॅट करात कपात केल्याने तेथील दर शंभर रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोलवर असणारे व्हॅट 30 टक्क्यावरुन 19.40 टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर आठ रुपयांनी स्वस्त झालं आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरात काय दर?
पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.21 इतका आहे. पुण्यात पेट्रोल दरात 38 पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली असून 92.95 रुपये प्रति लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल दर 111.64 रुपये इतका झाला आहे. डिझेलच्या दर प्रति लिटर 95.79 रुपये इतका आहे. नागपूरमध्ये पेट्रोलच्या दरात 10 पैशांनी वाढ झाली असून 109.92 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. डिझेलच्या दरातही 9 पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर 92.73 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Bank Strike : खासगीकरणाविरोधात बँका दोन दिवसांच्या संपावर; 'या' दोन दिवशी व्यवहार होणार ठप्प
- सरकार देणार दरमहा 3000 रुपये; नोव्हेंबर महिन्यात 46 लाखजणांनी केली नोंदणी, जाणून घ्या योजना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha