Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) जगाच्या चिंतेत भर पडली आहे. भारतात देखील कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. ब्रिटनमध्ये नवे 75 ओमायक्रॉन बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रकरणासह, इंग्लंडमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या आता 104 वर पोहोचली आहे.


इंग्लंड सरकारने यावर प्रतिक्रिया देत एकूण रुग्ण संख्या 104 झाल्याचं मान्य केलं आहे. इंग्लंड सरकारनं पुढे सांगितलं की, हे नवीन रुग्ण इंग्लंडच्या पूर्व, लंडन, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, दक्षिण पूर्व, दक्षिण पश्चिम आणि पूर्व आणि पश्चिम मिडलँड्समधून येथे सापडले आहेत. यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने (UKHSA) सांगितलं आहे की, नवे रुग्ण आढळलेल्या भागात आणि आसपासच्या ठिकाणी जास्त चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे.


वेल्समध्ये सापडला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
ब्रिटनच्या वेल्समध्ये शुक्रवारी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. वेल्स सरकारने सांगितले की, ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सुरुवातीला कार्डिफ आणि वेले युनिव्हर्सिटी हेल्थ बोर्ड परिसरात सापडले होते. या बाधितांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. दरम्यान, शुक्रवारी स्कॉटलंडमध्ये आणखी 16 रुग्ण आढळून आले. त्यानंतर देशातील एकूण 29 लोक या नवीन प्रकाराचे बळी ठरले.


पंतप्रधानांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला 
ओमायक्रॉनचे वाढते संक्रमन पाहता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देशातील सर्व लोकांना संसर्गापासून सावध राहण्याचे आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. जॉनसन यांनी म्हटलं आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.'' जॉनसन यांनी लोकांना कोविड लसीचा बूस्टर डोस घेण्याचं आवाहनही केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha