Omicron Variant in India : देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहायला मिळतोय. देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 4 हजार 461 वर पोहोचली आहे. यामध्ये एक सकारात्मक बातमी अशी आहे की, गेल्या दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. भारतातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 4 हजार 461 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 1,711 रुग्ण बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ओमायक्रॉनचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये 31 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, एकूण रुग्णांची संख्या 1257 झाली आहे.


महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या सर्वाधिक 1,247 रुग्णांची नोंद झाली आहेत, त्यानंतर राजस्थान 645, दिल्ली 546, कर्नाटक 479, केरळ 350 आणि उत्तर प्रदेश 275 आहेत. केरळमध्ये देखील ओमिक्रॉनच्या 17 नवीन प्रकरणांची नोंद झाली असून कोविड-19 च्या नवीन प्रकाराने संक्रमित लोकांची एकूण संख्या 345 वर पोहोचली आहे. हरियाणामध्ये काल कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराची 26 नवीन प्रकरणे जोडली गेली.


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अनेक दिवसांच्या सततच्या वाढीनंतर भारतातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासामध्ये देशात 1 लाख 68 हजार 63 इतके नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. हा आकडा एका दिवसाआधीच्या आकड्यापेक्षा कमी आहे. सोमवारी देशात 1 लाख 79 हजार 723 नवे रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेने गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. तर, 277 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 कोटी 58 लाख 75 हजार 790 इतकी झाली असून यामध्ये 4 लाख 84 हजार 213 रुग्णांचा मृत्यू आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha