Covid-19 New Cases Today : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. दरम्यान, कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 698 हजार 63 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 277 लोकांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांमध्ये 6.4 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी देशात 1 लाख 79 हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


दरम्यान, काल दिवसभरात 69,959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरातील रुग्णांची आकडेवारी समोर आल्यानंतर कोरोनाबाधितांच्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 3 कोटी 58 लाख 75 हजार 790 वर पोहोचली आहे. अशातच आतापर्यंत या महामारीमुळे 4 लाख 84 हजार 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


कोविड-19 मध्ये आतापर्यंत देशात 3 कोटी 45 लाख 70 हजार 131 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता, सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 8 लाख 21 हजार 446 वर पोहोचली आहे. भारतात सोमवारी 15,79,928 सँपल टेस्ट करण्यात आले. कालपर्यंत एकूण 69 कोटी 31 लाख 55 हजार 280 सँपल टेस्ट करण्यात आले होते. 





कोवॅक्सिनच्या तिसऱ्या डोसनंतर कोरोनापासून कडेकोट संरक्षण


भारत बायोटेकने बूस्टर शॉट म्हणून कोविड-19 च्या 'कोव्हॅक्सिन' लसीच्या सुरक्षितता आणि रोगप्रतिकारकतेच्या चाचणीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) रविवारी (9 जानेवारी) एक ट्वीट शेअर केले. त्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी कोवॅक्सिनच्या बूस्टर डोसची सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक शक्तीबद्दल खात्री देणारी विश्वसनीय माहिती आम्ही देत आहोत.' आयसीएमआर या ट्वीटमधून  कोवॅक्सिनच्सा तिसऱ्या लसीबाबत माहिती दिली आहे.


...तरच कोरोना चाचणी करा; आयसीएमआरची नवी नियमावली


संपूर्ण जगाची धाकधुक वाढवणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Covid-19) नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) देशातही आपले हातपाय पसरले आहेत. देशात एकंदरीतच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून सोमवारी कोरोना चाचणीबाबत नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्सनुसार, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. 


कोरोना रुग्णांचा संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणीबाबत (Corona Test) आता आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने  (ICMR) नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.  एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीला जास्ती धोका नसेल अशाच व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. मात्र, ज्यांचे वय जास्ती आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह