​Punjab National Bank Recruitment : जर तुम्ही बँकेत जॉब शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. पंजाब नॅशनल बँक  (Punjab National Bank) ने चीफ रिस्क ऑफिसर (Chief Risk Officer) आणि इतर पदांसाठी भरती काढली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. ते PNB ची अधिकृत वेबसाईट pnbindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) 10 जानेवारी, 2022 पर्यंत आहे. 


अधिसूचनेनुसार, (According to Notification) या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 6 पदं भरली जातील. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार (Applicant) जे PNB च्या अधिकृत साइट pnbindia.in वर अर्ज करू शकतात.


Punjab National Bank भरती 2022 : रिक्त जागांचा तपशील



  • ​चीफ रिस्क ऑफिसर : 1 पद

  • मुख्य अनुपालन अधिकारी : 1 पद

  • मुख्य वित्त अधिकारी : 1 पद

  • मुख्य तांत्रिक अधिकारी : 1 पद

  • मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी : 1 पद

  • मुख्य डिजिटल अधिकारी : 1 पद


अशी होईल निवड प्रक्रिया : 


निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिक स्क्रिनिंग असतं आणि अर्जांसोबत दाखल केलेले पात्रता निकष, उमेदवाराची पात्रता, योग्यता/अनुभव इत्यादींच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केलं जाईल. प्राथमिक चौकशीनंतर आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, उमेदवारी सर्व पदांसाठी तात्पुरती असेल आणि जेव्हा उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी अहवाल देईल तेव्हा सर्व तपशील/कागदपत्रांची मूळ पडताळणीच्या अधीन असेल. इच्छुक उमेदवारांनी भरलेला अर्ज जनरल मॅनेजर-एचआरएमडी, पंजाब नॅशनल बँक, एचआर डिव्हिजन, पहिला मजला, वेस्ट विंग, कॉर्पोरेट ऑफिसर, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली- 110075 या पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI