एक्स्प्लोर
Advertisement
मास्टर ब्लास्टरने अनुभवला ऑफ रोड ड्रायव्हिंगचा थरार
चिनने नुसतचं सहभाग न घेता मैदानात उतरून त्याने ऑफ रोड ड्रायव्हिंगचा थरार अनुभवला. आपण या खेळात देखील मास्टर ब्लास्टर होऊ शकतो हेही त्याने दाखवून दिले.
पणजी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला मास्टर ब्लास्टर सध्या ऑफ रोड कार रेसिंगमध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे. गोव्यात रविवारी अपोलो टायर्स तर्फे आयोजित बॅड रोड बडीजच्या समारोप सोहळयाला सचिनने सहभाग घेतला. दक्षिण गोव्यातील केपे येथील पठारावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
सचिनने नुसतचं सहभाग न घेता मैदानात उतरून त्याने ऑफ रोड ड्रायव्हिंगचा थरार अनुभवला. आपण या खेळात देखील मास्टर ब्लास्टर होऊ शकतो हेही त्याने दाखवून दिले. यापूर्वी सचिनने आपली ऑफ रोड रेसिंगमध्ये कार चालवण्याची हौस विदेशात भागवली होती. सचिनचे गाडयांचे प्रेम सर्वश्रुत आहे. गोव्यात यापूर्वी कार्ट रेसिंग ट्रॅकवर सचिन चौफेर फटकेबाजी करताना दिसला होता.
VIDEO | मास्टर ब्लास्टरची ऑफ रोड ड्रायव्हिंग राईड | एबीपी माझा
सचिन देशात पहिल्यांदाच रविवारी गोव्यात ऑफ रोड रेसिंगसाठी मैदानात उतरला. दक्षिण गोव्यातील केपे येथील पठारावर नैसर्गिक ट्रैकवर सचिन कार घेऊन मैदानात उतरला आणि त्याने आपले लक्ष्य साध्य करत सगळ्यांना चकित केलं. त्यानंतर सहचालक बनून सचिनने आणखी एक थरार अनुभवला जो प्रशिक्षित ऑफ रोड रेसर्सस करतात. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खडयात कार उतरवून ती बाहेर काढण्याचा अनुभव ग्रेट होता असे सचिनने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement