Nuclear power : देशाची अणुऊर्जा  (Nuclear power) निर्मितीची सध्याची स्थापित क्षमता 23 अणुऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून 7480 मेगावॉट इतकी आहे. 2031 पर्यंत अणुऊर्जा निर्मितीची क्षमता 22480 मेगावॉटपर्यंत वाढेल, असे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Minister Jitendra Singh) यांनी व्यक्त केले. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. 


देशात सध्या विविध भागात उभारणी सुरू असलेले आणि मंजुरी मिळालेले प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यावर अणुऊर्जा निर्मितीक्षमता वाढेल असेही जितेंद्र सिंह म्हणाले. सरकारने भविष्यात अणुभट्ट्या उभारण्यासाठी नव्या प्रकल्प स्थळांना तत्वतः मान्यता दिली असल्याचे सिंह म्हणाले. 2022-23 या वर्षात अणुऊर्जा प्रकल्पांमधून 46,982 दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती झाल्याची माहिती त्यांनी दिली.


महाराष्ट्रातील तारापूर अणुऊर्जा केंद्रातून ऊर्जा निर्मिती


महाराष्ट्रातील तारापूर अणुऊर्जा केंद्र हे पालघर जिल्ह्यातील तारापूर इथं आहे. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. यामधून सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती केली जाते. 160 मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प 1969 साली सुरू झाला. सध्या चार युनिटमधून ही ऊर्जानिर्मिती केली जाते. पहिल्या युनिटमधून 160 दुसऱ्या युनिटमधून 160, तिसऱ्या  आणि चौथ्या युनिटमधून 540 मेगावॉट ऊर्जा निर्मिती केली जाते. तसेच अन्य राज्यामध्ये देखील अणुऊर्जा निर्मिती केली जाते. यामध्ये राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. 


राज्सथानमधील रावतभाटा येथील अणुऊर्जा प्रकल्पातील सहा युनिटमधून ऊर्जा निर्मिती केली जाते. तसेच तामिळनाडूमधील कल्पक्कम आणि कुडानकुलम या प्रकल्पातून ऊर्जा निर्मिती केली जाते. उत्तर प्रदेशातील नरोरा, गुजरातमधील काक्रापार आणि कर्नाटकातील कैगा या अणुऊर्जा प्रकल्पातून ऊर्जा निर्माण खेली जाते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ratnagiri News : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने पुढील दोन महिने महत्त्वाचे