एक्स्प्लोर
आता, घर खरेदीसाठी पीएफमधील 90% रक्कम काढता येणार!

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सुमारे चार कोटी ग्राहक, घर खरेदीसाठी आपल्या पीएफ खात्यातील जमा रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढू शकतात. ग्राहक ही रक्कम घराचं डाऊन पेमेंट आणि हफ्ते फेडण्यासाठी वापरु शकतात. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ईपीएफओने योजनेत दुरुस्ती करुन, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, 1952 मध्ये नवा परिच्छेद 68 बीडी जोडला आहे. जेणेकरुन ग्राहक घर खरेदीसाठी ईपीएफ खात्यामधून डाऊन पेमेंट आणि हफ्ते फेडू शकतात. "श्रम मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केल्याने या योजनेत दुरुस्ती करण्यात आली आहे," असंही अधिकाऱ्याने सांगितलं.
घर घेण्यापूर्वी या गोष्टी जरुर लक्षात ठेवा
नव्या तरतुदीनुसार, ईपीएफधारक कमीत कमी 10 सदस्य असलेल्या सहकारी किंवा हाऊसिंग सोसायटीचा सदस्य म्हणून, घर खरेदीसाठी किंवा घर आणि जागा खरेदीसाठी ईपीएफ खात्यातील जमा रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढू शकतात. मात्र ज्या पीएफ ग्राहकांनी तीन वर्ष खात्यामध्ये योगदान दिलं, त्यांनाच खात्यामधून रक्कम काढण्याची सुविधा असेल. तसंच ही सुविधा एकदाच मिळणार आहे. संबंधित बातम्या: 'ईपीएफओ'च्या 'या' कर्मचाऱ्यांना 50 हजारांचा लॉयल्टी बोनस खुशखबर! घर खरेदीसाठी पीएफमधील 90 % रक्कम काढता येणार पडून असलेला पीएफ गहाण ठेवा, घर खरेदी करा ! पहिलं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, पंतप्रधान आवास योजनेत भरघोस सूट! ‘या’ कारणांसाठी तुम्ही पीएफची संपूर्ण रक्कम काढू शकाल VIDEO: गृहकर्जावरील व्याजदरात 3 ते 4 टक्के कपात : पंतप्रधान हक्काचं घर मिळवून देण्यासाठी योजनाBefore You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj






















