एक्स्प्लोर

आधार कार्डच्या धर्तीवर आता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी

येत्या मार्च महिन्यापासून व्हर्च्युअल आयडीची सुरुवात केली जाईल. मात्र जूनपासून अनिवार्य केले जाईल. ज्या यंत्रणा या व्हर्च्युअल आयडीच्या दृष्टीने सुविधांमध्ये बदल करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आधार कार्डच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडी सुरु करण्याची घोषणा केली आहे. व्हर्च्युअल आयडी 16 अंकांचं असेल. आधार कार्डमधील माहिती चोरी होत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होते. त्यातच एका इंग्रजी वृत्तपत्राने असाही दावा केला होता की, काही रकमेच्या बदल्यात आधार कार्डवरील माहिती मिळवणं अगदी शक्य आहे. दुसरीकडे, आरबीआयशी संबंधित एका संस्थनेही दावा केला होता की, आधार कार्डवरील माहिती सायबर गुन्हेगारांना मोठी मदतीची ठरते आहे. आधार कार्डमधील माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा मात्र यूआयडीएआयने कायमच केला आहे. ती माहिती लीक होणं शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मात्र तरीही खासगी सुरक्षेचं कारण पुढे करत यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडीची घोषणा केली आहे. व्हर्च्युअल आयडी सध्या जे आधार कार्ड आहे, त्यात एकूण 12 अंक असतात. मात्र व्हर्च्युअल कार्डमध्ये 16 अंक असतील.
  • कुणीही नागरिक यूआयडीएआयच्या वेबसाईटवर (https://uidai.gov.in) जाऊन आधीच्याच आधार कार्डच्या माहितीवरुन व्हर्च्युअल आयडी बनवू शकतो. ज्यांच्याकडे सध्या आधार कार्ड आहे, त्यांनाच हे शक्य आहे.
  • 16 अंकांचं हे व्हर्च्युअल आयडी ठराविक वेळेपुरते मर्यादित असेल. त्यामुळे मुदतीनंतर पुन्हा नवीन व्हर्च्युअल आयडी बनवावं लागेल. एकावेळी एकच आयडी बनवणं शक्य असेल, जुन्या आयडीची मुदत संपल्यानंतरच नवीन बनवू शकतात.
  • व्हर्च्युअल आयडीतून बँक किंवा फोन कंपन्यांना नागरिकांची केवळ मर्यादित माहिती (नाव, पत्ता, फोटो) मिळेल. एवढीच माहिती त्यांना गरजेची असते. त्यापलिकडे माहिती या कंपन्यांना दिली जाणार नाही.
  • आधार कार्ड ज्याप्रमाणे ओळखपत्र म्हणून वापरलं जाऊ शकतं, त्याच धर्तीवर व्हर्च्युअल आयडीही ओळखपत्र म्हणून वापरलं जाऊ शकतं.
  • जिथे कुठे ओळखपत्राची आवश्यकता असेल किंवा केवायसी करायचं असेल, तिथेही व्हर्च्युअल आयडी स्वीकारलं जाईल.
येत्या मार्च महिन्यापासून व्हर्च्युअल आयडीची सुरुवात केली जाईल. मात्र जूनपासून अनिवार्य केले जाईल. ज्या यंत्रणा या व्हर्च्युअल आयडीच्या दृष्टीने सुविधांमध्ये बदल करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आतापर्यंत देशभरात 119 कोटी आधार नंबर जारी केले गेले आहेत. कोणताही भारतीय  नागरिक आधार कार्ड काढू शकतं. भारतीय नागरिकत्त्वाचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड असल्याचेही अनेकदा सरकारने म्हटले आहे. अनेक योजनांसाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
Eknath Shinde On Chakan MIDC Pune News: एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Amravti hospital fire new born baby death: मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget