एक्स्प्लोर

कोणत्याही मंत्र्यांनं लाल दिव्याची गाडी वापरु नये: योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शपथविधीनंतर तात्काळ कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री योगींनी स्पष्ट केलं आहे की, 'कोणतेही मंत्री लाल दिव्याची गाडी वापरणार नाही.' एवढंच नव्हे तर मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपली संपत्ती 15 दिवसात जाहीर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. शपथविधीनंतर योगी आदित्यनाथ यांनी बैठका घेणं सुरु केलं. आज त्यांनी उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा केली. उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिेले आहे. योगी आदित्यनाथ यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या सचिवांशी देखील चर्चा केली. दरम्यान, आजपासून योगी आदित्यनाथ यांनी आपला मुक्काम आजपासून मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या शासकीय बंगल्यात हलवला आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच योगी आदित्यनाथ यांनी पाच गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आदित्यनाथ यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना 15 दिवसात संपत्तीचा तपशील देण्यास सांगितलं आहे. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यातील गोष्टी अजेंड्यावर असतील, असंही स्पष्ट केलं. ‘’संपत्तीचा तपशील सार्वजनिक करा’’ योगी आदित्यनाथ यांची शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रिमंडळासोबत बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. सर्व मंत्र्यांना आपली संपत्ती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले असल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं. तरुणांना रोजगार उत्तर प्रदेशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहिल, असंही आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या जाहीरनाम्यातील घोषणा पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जाईल, असंही ते म्हणाले. ‘’वादग्रस्त वक्तव्य करु नका’’ सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य करणं टाळावं, असाही सल्ला दिला आहे. दोन प्रवक्त्यांची नियुक्ती आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीकांत शर्मा आणि सिद्धार्थ नाथ सिंह हे भाजपचे प्रवक्त म्हणून काम पाहतील. ग्रामीण भागाला प्राधान्य उत्तर प्रदेशातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करणं सरकारची प्राथमिकता असेल, असं आदित्यनाथ यांनी सांगितलं. शिवाय ग्रामीण भागाच्या विकासासाठी योजना बनवल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं. संबंधित बातम्या: योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्याच दिवशी पाच घोषणा योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील 46 चेहरे कोण? शपथविधीपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांची सडकून टीका योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लीम चेहरा

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
Embed widget