North East Express Train Accident: बिहारमधील (Bihar) बक्सरमध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाल्याचं समोर आलं असून दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले आहेत. यामध्ये 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. 


 






केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी ट्विटरवर याची माहिती देताना म्हणाले की, "बक्सरमधील रघुनाथपूर रेल्वे स्थानकावर नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. मी केदारनाथला प्रार्थना करतो की सर्व प्रवासी सुरक्षित असावेत. मदतकार्य सुरू झाले आहे. वैद्यकीय पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अपघातग्रस्त मदत वैद्यकीय व्हॅन अपघातस्थळी पोहोचलं आहे. 


 






बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही या प्रकरणी अधिकाऱ्यांची बोलून माहिती घेतली. ते म्हणाले की, "दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या अनेक बोगी बक्सरमध्ये उलटल्याची दुःखद घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभागाची मदत लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचली. या ठिकाणच्या बचाव कार्याला गती देण्याच्या आणि जखमींसाठी योग्य वैद्यकीय व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिहार सरकार पीडित आणि जखमींसाठी बचाव, मदत आणि उपचार कार्यात सक्रियपणे गुंतले आहे."


 






 


ही बातमी वाचा: