एक्स्प्लोर

डेबिट कार्डने दोन हजार रुपयांपर्यंतची खरेदी स्वस्त

मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे एमडीआरसाठी सबसिडी देण्याचा जो घेतला होता, तो आजपासून (1 जानेवारी) लागू झाला आहे.

नवी दिल्ली : डेबिट कार्डने दोन हजार रुपयांपर्यंतची खरेदी करणं आता स्वस्त झालं आहे. केंद्र सरकारने केवळ डेबिट कार्डच नाही, तर भीम आणि यूपीआय आधारित व्यवहारांवर दोन हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे एमडीआरसाठी सबसिडी देण्याचा जो घेतला होता, तो आजपासून (1 जानेवारी) लागू झाला आहे. एमडीआरला ट्रान्झॅक्शन फी असंही म्हटलं जातं. ही रक्कम कार्ड जारी करणारी संस्था वसूल करते. मोठे मॉल, दुकान आणि हॉटेल हा चार्ज स्वतः भरतात. तर छोटे दुकानदार हा पैसा ग्राहकांकडून वसूल करतात. एमडीआरमध्ये बँक किंवा वित्तीय संस्था मिळालेल्या रकमेपैकी काही पैसा छोट्या दुकानदारांना देतात. त्यामुळे याला मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे व्यवसायिकांना देण्यात येणाऱ्या रकमेतील कपात असं म्हटलं जातं. केंद्रीय कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, एक जानेवारीपासून सबसिडी देण्याची व्यवस्था लागू झाली. पुढील दोन वर्षांपर्यंत ती सुरु असेल. बँक किंवा पेमेंट करणाऱ्या संस्थेला ही सबसिडी दिली जाईल. यामुळे ग्राहक आणि दुकानदारांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक ताण पडणार नाही. शिवाय डिजिटल व्यवहारांना चालना मिळेल. एमडीआरवर सबसिडी दिल्याने 1050 कोटी रुपये 2018-19 मध्ये आणि 2019-20 मध्ये 1642 कोटी रुपये खर्च केले जातील, असा अंदाज आहे. एमडीआरची नवी व्यवस्था काय आहे? नव्या व्यवस्थेत देवाण-घेवाणीच्या रकमेऐवजी एकूण व्यवसाय एमडीआरसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. शिवाय पॉईंट ऑफ सेल्स म्हणजे पॉस आणि क्यूआर कोडच्या व्यवहारासाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये व्यवसायिकांना दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. प्रत्येक समुहासाठी दर वेगळे असतील. त्यानुसार, छोटे व्यवसायिक, म्हणजे गेल्या वर्षात ज्यांची वार्षिक उलाढाल एकूण 20 लाख रुपयांपर्यंत होती, त्यांच्यासाठी स्वाईप मशिनचा (पॉस) एमडीआर दर 0.4 टक्क्यांपर्यंत असू शकतो. म्हणजेच एक हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर 4 रुपयांचा एमडीआर असेल. मात्र एका व्यवहारावर एमडीआर जास्तीत जास्त 200 रुपये असू शकतो. छोट्या व्यवसायिकाकडे क्यूआर कोडची व्यवस्था असेल तर एमडीआर दर 0.3 टक्के असेल. म्हणजे एक हजार रुपयांच्या व्यवहारावर 3 रुपये एमडीआर द्यावा लागेल. एमडीआरची जास्तीत जास्त मर्यादा 200 रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही कितीही खरेदी केली तरी त्यावर 200 रुपयांपेक्षा जास्त एमडीआर वसूल करता येणार नाही. 20 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यवसायिकांसाठी एमडीआरचा दर 0.9 टक्क्यांपर्यंत असू शकतो. म्हणजेच एक हजार रुपयांच्या व्यवहारावर 9 रुपये एमडीआर लागेल. क्यूआरकोडसाठी एमडीआरचा दर 0.8 टक्के आहे, म्हणजे एक हजार रुपयांवर 8 रुपये लागतील. एमडीआर वसूल करण्याची कमाल मर्यादा 1000 रुपये ठेवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget