लखनऊ : उत्तर प्रदेश राज्यात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तसंच पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या यापुढील काळात बंद केल्या जाणार आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली. शिवाय त्यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणाही केली.
डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या निर्णयामुळे काही लोकांचा आक्षेप असेल याची आपल्याला कल्पना आहे, परंतु हे करणे आवश्यक आहे', अशा शब्दात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली.
महापुरुषांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीच्या दिवशी शाळा सुरू ठेवल्या तर शाळांमध्ये एक-दोन तासांचा विशेष कार्यक्रम आयोजित करता येईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संबंधित महापुरुषांबाबत मुलांना माहिती दिली जाईल, असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात जाहीर केला.
योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमात विरोधकांवरही निशाणा साधला. मायावतींनी यूपीत आंबेडकर जयंतीला सुट्टी देण्याची प्रथा सुरु केली. तर अखिलेश यादव यांच्या काळातही ही प्रथा सुरु राहिली, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.