नवी दिल्ली : सर्वसाधारण गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला आरक्षण देण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारने आज लोकसभेत स्पष्ट केले. केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी याबाबत सभागृहाला उद्देशून माहिती दिली.

"सर्वसाधारण गटातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव आमच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याबाबत आम्ही कोणताही विचार केला नाही", अशी माहिती समाज कल्याण राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी लोकसभेत दिली. त्यामुळे मराठा आरक्षणाचं काय होणार हा प्रश्न आहे.

देशाच्या विविध भागात विविध समजा समूहांसाठी आरक्षणाच्या मागणीला जोर धरु लागली आहे. आरक्षणावरी चर्चेदरम्यान अनेकदा आर्थिक निकषांवर आरक्षणाचा मुद्दाही समोर आणला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्र्यांची माहिती नक्कीच महत्त्वाची मानली जाते आहे.