एक्स्प्लोर

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून बहुमत सिद्ध!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बिहारमधील नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या नितीश कुमार यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. नितीश कुमार यांना 131 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर 108 आमदारांनी त्यांच्याविरोधात मत केलं. बिहार विधानसभेत एकूण आमदारांची संख्या 243 आहे. त्यामुळे इथे बहुमताचा आकडा 122 आहे. दरम्यान, काल नितीश कुमार यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. तर भाजपचे सुशील मोदी बिहारचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत. जदयू आणि भाजपचे प्रत्येकी 14-14 मंत्री मंत्रिमंडळात असतील अशी माहिती मिळते आहे. नितीश कुमार यांनी काल (26 जुलै) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिहारमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपने नितीश कुमारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपची बिहारच्या सत्तेत पुन्हा एन्ट्री झाली आहे. नितीश कुमार यांचा राजीनामा “बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे.  लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली. जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार राजीनाम्याची माहिती देत असताना मोदींचं ट्वीट नितीश कुमार राज्यपालांकडे राजीनामा देऊन बाहेर आले. माध्यमांना राजीनामा का दिला, याची माहिती देत असतानाच काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र आल्याबद्दल मोदींनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या. मोदी काय म्हणाले? भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन. देशाच्या आणि विशेषतः बिहारच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येऊन लढणं काळाची गरज आहे, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नितीश कुमारांकडून मोदींचे आभार एकीकडे मोदींनी नितीश कुमार यांचे आभार मानल्याची चर्चा सुरु असतानाच नितीश कुमार यांनी मोदींना धन्यवाद म्हटलं. राजीनाम्याच्या निर्णयाचं स्वागत केल्याबद्दल मी मोदींना मनापासून धन्यवाद देतो, असं ट्वीट नितीश कुमार यांनी केलं. नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित : लालूप्रसाद यादव नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊऩ नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असून त्यांच्यावरील आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. तसंच देशातील अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यावर इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप नसल्याचंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपसोबत सेटिंग करत नितीश कुमारांनी राजीनामा दिल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला. नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया मी कुणाला राजीनामा मागितला नाही. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना त्यांच्यावर लावण्यात येत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. मात्र असं काहीही झालं नाही. अशी परिस्थिती झाली की मी त्यामध्ये कामच करु शकत नव्हतो. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली. लालू प्रसाद यादव यांच्यावर होत असलेल्या सीबीआयच्या छापेमारीनंतर आणि अघोषित संपत्तीच्या कारवाईनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला. बिहारमध्ये महायुतीचं सरकार आहे. ज्यामध्ये काँग्रेसही मित्र पक्ष आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली. मात्र काहीही तोडगा निघाला नाही, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) : 
  • आरजेडी (लालू) – 80
  • जेडीयू (नितीश कुमार) – 71
  • काँग्रेस – 27
  • भाजप – 53
  • सीपीआय – 3
  • लोक जनशक्ती पार्टी – 2
  • राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
  • हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
  • अपक्ष – 4
काय आहे नेमकं प्रकरण? बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती. या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती. दुसरीकडे  लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता. बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर  गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली

Embed widget