एक्स्प्लोर

भाजपला दणका; तीन तलाक विधेयकाला विरोध करत नितीश कुमारांच्या जेडीयूचा सभात्याग

लोकसभेत तीन तलाक विधेयकावर सध्या चर्चा सुरु आहे. हे विधेयक आजच पास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

नवी दिल्ली : लोकसभेत तीन तलाक विधेयकावर सध्या चर्चा सुरु आहे. हे विधेयक आजच पास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या विधेयकासाठी सध्या मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जात आहे. परंतु त्यापूर्वीच भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जेडीयूने (जनता दल युनायटेड) या विधेयकाला विरोध केला आहे. संसदेतील जेडीयूच्या प्रतिनिधींनी विधेयकाला विरोध करत सभात्याग केला. जेडीयूचे मुंगेर मतदार संघातील खासदार ललन सिंह तीन तलाक विधेयकाला विरोध करत म्हणाले की, या विधेयकामुळे समाजात अविश्वास निर्माण होईल. आम्ही भाजपचे सहयोगी आहोत, परंतु कलम 370, समान नागरी कायदा आणि राम मंदिराबाबत आमचे विचार त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. तीन तलाकची समस्या सोडवण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जन जागृतीद्वारे समस्या सोडवायला हव्यात. ललन सिंह म्हणाले की, हा समाज कडक नियमांनी चालत नाही. समाजाकडे स्वतःचे काही नियम आहेत. यापूर्वीदेखील बनवण्यात आलेल्या अनेक कायद्यांचा गैरफायदा उचलला गेला आहे. तीन तलाकसारखे कायदे झाले तर समाजातील काही लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करतील. पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जेडीयूला मुस्लीम समाजाची मतं हवी आहेत. त्यामुळेच जेडीयूचे नेते आत्ता तीन तलाक विधेयकाला विरोध करुन मुस्लीम मतदारांमध्ये स्वतःच्या पक्षाबाबत सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. Triple Talaq Bill : इस्लाममध्ये लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, त्याला सात जन्मांचा मुद्दा बनवू नका : असदुद्दीन ओवेसी

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget