एक्स्प्लोर

'अच्छे दिन' वास्तवात नसतात, मानण्यावर असतात: गडकरी

भाजप 2019 च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आले असं जनतेला सांगू शकेल का? असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला.

नवी दिल्ली: ‘अच्छे दिन’ वास्तवात कधीच नसतात, ते मानण्यावर असतात, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केलं. ते ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’मध्ये बोलत होते. भाजप 2019 च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आले असं जनतेला सांगू शकेल का? असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. त्यावर गडकरी म्हणाले, “वास्तवात ‘अच्छे दिन’ नसतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या सद्य परिस्थितीवर कधीच संतुष्ट नसतो. जो नगरसेवक होतो, तो आमदार झालो नाही म्हणून दु:खी असतो. जो आमदार असतो तो खासदार न झाल्याने दु:खी असतो. खासदार असतो तो मंत्री न झाल्याने दु:खी असतो. मंत्री चांगलं खातं न मिळाल्याने दु:खी असतो. म्हणजे लोक असाच विचार करत असतात. ते स्वत:च्या परिस्थितीवर कधीच समाधानी नसतात. ज्याच्याकडे मर्सिडीज आहे तो दु:खी आहे, ज्याच्याकडे दुचाकी आहे तो सुद्धा दु:खी आहे. त्यामुळे अच्छे दिन हे मानण्यावर असतात” अच्छे दिनचा अर्थ अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. पंतप्रधान आवास योजनेतून घरं बनत नाहीत का? सागरमाला प्रकल्पांतर्गत 16 लाख कोटीची गुंतवणूक होत आहे. हे अच्छे दिन नाहीत का, असा सवाल गडकरींनी विचारला. सोनियांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने 2019 मध्ये भाजपला सत्तेवरुन खाली खेचून पुन्हा यूपीए सरकार सत्तेत येईल, असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्याबाबत गडकरींना विचारलं असता, ते म्हणाले “काँग्रेसला 2019 मध्ये पुन्हा सत्तेत येऊ असं वाटणं म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहे. नुकतंच ईशान्य भारतातील निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. आम्ही जिंकत आहोत, केरळ आणि बंगालमध्येही चांगली कामगिरी करु. काँग्रेसला 50 वर्षात जे जमलं नाही, ते आम्ही 4 वर्षात करुन दाखवलं. सर्व अपेक्षा 5 वर्षात पूर्ण होणं शक्य नाही. भाजप 2019 मध्ये पुन्हा सत्तेत येईल”

महत्त्वाच्या बातम्या

NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget