नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली. राष्ट्रपतींनी दया याचिका घाईगडबडीनं फेटाळली असं म्हणत मुकेश सुप्रीम कोर्टात गेला.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेशची शेवटची याचिका सुनावण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. दोषी मुकेश कुमार सिंह याने राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
काही दिवसांपूर्वी दोषी मुकेश सिंह यांनी तिहार तुरुंग प्रशासनाकडे दया याचिका दिली होती. ही याचिका राष्ट्रपतींकडे तिहार प्रशासनाच्या माध्यमातून दिल्ली सरकार नंतर राज्यपाल आणि पुन्हा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राष्ट्रपतींकडे पोहोचली होती.
काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.
राष्ट्रपतींनी फेटाळलेल्य दोषी मुकेशच्या दया याचिकेवर आज सुनवाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jan 2020 11:46 PM (IST)
गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे दया याचिका फेटाळल्यानंतर ती फाईल दिल्ली सरकारकडे पाठवली आहे. मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवण्याबरोबरच ती फेटाळल्याची शिफारसही केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -