एक्स्प्लोर

Nirbhaya Case | दोषी अक्षय ठाकूरच्या पत्नीची खेळी, पतीपासून घटस्फोसाठी अर्ज

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या अक्षय ठाकूरच्या पत्नीने एका कौटुंबिक न्यायायलयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. अक्षयच्या पत्नीने कायदेशीर नियमांचा दाखला देत कोर्टाकडे घटस्फोट मंजूर करण्याची विनंती केली आहे

औरंगाबाद (उत्तर प्रदेश) : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील दोषी अक्षय ठाकूरची पत्नी पुनीताने त्याला फाशीपासून वाचवण्यासाठी कायदेशीर खेळी खेळली आहे. पुनीताने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. पुनीताने आपल्या अर्जात म्हटलं आहे की, मला विधवा बनून राहायचं नाही. अक्षयच्या पत्नीने औरंगाबाद कौटुंबिक न्यायायलयाचे न्यायाधीश रामलाल शर्मा यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला आहे. अर्जात म्हटलं आहे की, "माझ्या पतीला बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे आणि त्याला फाशी देण्यात येणार आहे. परंतु तो निर्दोष आहे. त्यामुळे मला त्याची विधवा बनून राहायचं नाही."

अक्षयच्या पत्नीची कायदेशीर खेळी? अक्षयच्या पत्नीचे वकील मुकेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, "हिंदू विवाह कायदा १३ (२) (II) अंतर्गत काही खास प्रकरणात घटस्फोटाचा अधिकार आहे, या प्रकरणांमध्ये बलात्काराचाही समावेश आहे. जर बलात्काराच्या प्रकरणात एखाद्या महिलेच्या पतीला दोषी ठरवलं तर ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करु शकते."

अक्षयसह चार दोषींना 20 मार्च रोजी फाशी या प्रकरणातील चार दोषींना २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. अक्षयने फाशीपासून वाचण्यासाठी अनेक मार्ग वापरले होते. परंतु कनिष्ठ कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अक्षयची दया याचिका फेटाळली आहे. निर्भयाचे दोषी अक्षय, पवन, मुकेश आणि विनय यांचे सर्व कायदेशीर रस्ते बंद झाले आहेत.

तिहारच्या जेल क्रमांक 3 मध्ये बंद या चौघांना सध्या तरी कुटुंबीयांची भेट घेण्यास अद्याप बंद केलेलं नाही. पण त्यांची अखेरची भेट आता १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच होऊ शकते. यानंतर त्यांना कोणाचीही भेट घेऊ दिली जाणार नाही.

दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद निर्भया गँगरेप आणि हत्या प्रकरणातील चारपैकी तीन दोषींनी फाशी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. दोषी अक्षय, पवन आणि विनयने आंतरराष्ट्रीय कोर्टात अर्ज दाखल केला आहे. तिन्ही दोषींनी आयसीजेला पत्र लिहून फाशी टाळण्याची विनंती केली आहे. दोषींचे वकील एपी सिंह यांनी म्हटलं आहे की, फाशीच्या शिक्षेविरोधात जगभरातील विविध संघटनांनी आयसीजेचं दार ठोठावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget