Rajasthan IPS Transfer : उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांडानंतर राजस्थानमधील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर राजस्थान सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं 32 IPS अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये उदयपूरचे IG हिंगलाज दान आणि SP मनोज कुमार यांच्या नावाचाही समावेश आहे.  या महत्वांच्या ठिकाणावरुवन या अधिकाऱ्यांची बदली करुन कमी महत्वाच्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे करौली येथील जातीय हिंसाचाराच्या घटनेनंतर SP शैलेंद्र कुमार यांनाही हटवण्यात आलं आहे.


कडेकोट बंदोबस्तात दोन्ही आरोपी न्यायालयात हजर 


दरम्यान, उदयपूर येथील स्थानिक न्यायालयानं कन्हैया लाल हत्येतील दोन्ही आरोपींना 13 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद यांना पोलीस व्हॅनमधून न्यायालयात आणण्यात आलं. यावेळी दोन्ही गुन्हेगारांचे चेहरे झाकलेले होते.  पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपींना घटनेच्या काही तासांनंतरच राजसमंद जिल्ह्यातील भीम परिसरातून मोटारसायकलवरुन जात असताना अटक करण्यात आली.


NAI कडून कट्टरपंथी गटांच्या भूमिकेची चौकशी सुरु  


एनआयए या प्रकरणात कट्टरपंथी गटांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. दोन मुख्य आरोपींशी संलग्नीत इतर काही जणांचा देखील तपास सुरु आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, हे दोन्हीही आरोपी  पाकिस्तानी सुन्नी इस्लामिक संघटना दावत-ए-इस्लामीचे सदस्य बनले होते. त्यापैकी एक पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात होता. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे खूप घाईचे असल्याचे एनआयए नं म्हटलं आहे. 


काय आहे प्रकरण?


सोमवारी उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्टेशन परिसरात दोन जणांनी दुकानात घुसून कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर कन्हैया यांचा गळा चिरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यामुळे उदयपूरमधील वातावरण तापलं होत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आदेश येईपर्यंत उदयपूरच्या सात पोलीस ठाण्यांच्या परिसरात तात्काळ संचारबंदी लागू करण्यात आली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया याची हत्या करण्यात आल्यानंतर आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीम परिसरातून त्याब्यात घेण्यात आले. राजसमंदचे पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी हेल्मेट घालून मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण भीमा परिसरात नाकाबंदी दरम्यान त्यांना पकडले गेले.


महत्वाच्या बातम्या: