एक्स्प्लोर
उद्यापासून सलग तीन दिवस बँका बंद!
मुंबई: तुमचे बँकेत काही कामं असल्यास ती आजच करुन घ्या. कारण उद्यापासून पुढचे तीन दिवस बँक बंद राहणार आहेत. उद्या महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळं बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर रविवारी होळी आणि सोमवारी धुळवड आल्यानं बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत.
शनिवारी, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार अडवून ठेवण्यापेक्षा आजच बँकेत जाऊन तुमचं काम आटपून घेतलेलं सोयीचं ठरणार आहे.
दरम्यान, बँका तीन दिवस बंद असल्यानं नागरिकांना एटीएमवर अवलंबून राहावं लागणार आहे. पण बँका बंद असल्या तरीही तुम्ही नेट बँकिंगच्या माध्यमातून तुमचे व्यवहार करु शकता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement