लखनौ : लग्न लागल्यानंतर सासरी जाणाऱ्या नववधूची भर हायवेवर हत्या केल्याप्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नवदाम्पत्य आणि वऱ्हाडींची लूटमार करताना नववधूने आरडाओरडा केल्यामुळे तिच्यावर गोळीबार केला, अशी कबुली आरोपींनी दिवी आहे.


उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये 27 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेत 18 वर्षीय मेहवीश परवीनला प्राण गमवावे लागले होते.

नवदाम्पत्य जात असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीचा चौघा लुटारुंनी आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीतून पाठलाग सुरु केला. दौराला भागात पोहचल्यावर त्यांनी वऱ्हाडींच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि लूटमार सुरु केली. याचवेळी मेहवीशने आरडाओरड केली, त्यामुळे एका आरोपीने तिच्यावर गोळी झाडली. गोळीबारात मेहवीशचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपींकडून वर्ना कार, नववधूचे लुटलेले दागिने, बाईक, तीन मोबाईल, साडेसहा हजार रुपयांची रोकड आणि काडतुसं जप्त केली आहेत. आरोपी अक्षयला अटक झाली असून फरार असलेल्या सुरज, धीरज आणि हिमांशू यांचा शोध सुरु आहे.

मेहवीशवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या एखाद्या तरुणाने ही हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी सुरुवातीला वर्तवला होता.