नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणार्या प्रवाशांसाठी 22 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 11:59 वाजेपासून नवीन एसओपी लागू केल्या जाणार आहेत. ब्रिटन, युरोप आणि मिडल ईस्टहून येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने विशेष नियम तयार केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं की, सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू होणारे हे एसओपी यूके, युरोप आणि मिडल ईस्ट ते भारतातील प्रवाशांना लागू नाहीत. कारण त्यांच्यासाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्यात आले आहेत. सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी भारतात येणार्या एसओपीचे दोन मुख्य भाग आहेत. प्रवासाची तयारी आणि विमानात चढण्यापूर्वीची तयारी.
प्रवासाची तयारी (सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय प्रवाशासाठी)
1. एअर फॅसिलिटी पोर्टलवर कोरोना नसल्याबद्दल सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागेल.
3. आरटीपीसीआर चाचणी अहवाल ऑनलाईन सादर करावा लागतो. हा अहवाल प्रवासाच्या 72 तासांच्या आत बनवावा. या अहवालाच्या सत्यतेसाठी सेल्फ डिक्लरेशन द्यावं लागेल.
3. प्रवाशांना ऑनलाईन अंडरटेकिंग द्यावी लागेल की ते भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या 14 दिवसांच्या क्वॉरंटाईन नियमांचे किंवा सेल्फ क्वॉरंटाईन नियमांचे पालन करेल.
4. कुटुंबात मृत्यू झाल्यास प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोविड अहवाल देण्यापासून सूट देण्यात येईल. या सवलतीच्या प्रवासासाठी 72 तास आधी ऑनलाईन अर्ज द्यावा लागतो. या अर्जावर शासकीय परवानगी मिळाल्यानंतरच प्रवास करणे शक्य होईल.
कोरोना अजून संपला नाही, मोदी सरकारला अतिआत्मविश्वास; राहुल गांधींचा निशाणा
विमानात चढण्यापूर्वी तयारी
1. तिकीटासोबत काय करावे आणि काय करू नये याची यादी दिली जाईल.
2. एअर फॅसिलिटी पोर्टलवर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरावा आणि आरटीपीसीआर अहवाल सादर करावा.
3. थर्मल स्क्रीनिंगनंतर केवळ असिम्टोमॅटिक प्रवाशांच्या बोर्डिंगला परवानगी देण्यात येईल.
4. आरोग्य सेतू अॅप मोबाइलवर डाउनलोड केले जावे.
5. एअरपोर्ट आणि प्रवाशांच्या स्वच्छतेची काळजी संबंधित यंत्रणांना घ्यावी लागेल.
6. प्रवासादरम्यान शारीरिक अंतराचे नियम पाळणे आवश्यक आहे.
7. प्रवासादरम्यान मास्क अनिवार्य असतील आणि हात स्वच्छ ठेवावे लागतील.
मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेतही होणार कारवाई, विशेष मार्शल नेमणार
प्रवास पूर्ण झाल्यानंतर - जे प्रवासी यूके, युरोप आणि मिडल ईस्ट व्यतिरिक्त इतर देशांचे आहेत
1. प्रवास पूर्ण झाल्यावर, ज्या प्रवाशांना आरटीपीसीआर अहवाल आणण्यास सूट देण्यात आली आहे त्यांचे नमुने घेण्यात येतील. त्यानंतर त्यांना सोडण्याची परवानगी देण्यात येईल. हा अहवाल सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यास त्यांना कळवून पुढील नियमांचे त्यांना पालन करावे लागणार.
2. इतर प्रवाशांना त्यांच्या ऑनलाइन नकारात्मक अहवालाच्या आधारे निघण्याची परवानगी देण्यात येईल. परंतु त्यांना 14 दिवस त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे लागेल.
3. सर्व प्रवाशांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय सर्विलान्स अधिकाऱ्यांची यादी दिली जाईल. जेणेकरुन प्रवासी त्यांना आवश्यक असल्यास त्यांच्या आरोग्याविषयी सांगू शकतील.
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना मास्क न वापरल्याने दंड
प्रवास पूर्ण झाल्यानंतर - यूके, युरोप आणि मध्य पूर्व देशांमधील प्रवासी
1. सर्व प्रवाशांना सॅम्पल द्यावा लागतो.
2. यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील नसलेल्या प्रवाशांना सॅम्पल दिल्यानंतर जाण्याची परवानगी देण्यात येईल. या प्रवाशांना 14 दिवस त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवावी लागेल. पॉझिटिव्ह आल्यावर उपचार सरकारी क्वॉरंटाईन होऊन उपचार करावे लागतील. मग त्यांचे नमुने देखील जीनोम सिक्वेंसींगसाठी पाठवले जातील.
3. यूके, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलहून आलेल्या प्रवाशांना सॅम्पल दिल्यानंतर तेथून निघण्याची परवानगी देण्यात येईल. परंतु या प्रवाशांना 7 दिवसांच्या सेल्फ-क्वॉरंन्टाईनमध्ये राहावे लागेल आणि सात दिवसानंतर टेस्ट करुन घ्यावी लागेल. पॉझिटिव्ह आल्यावर उपचार सरकारी क्वॉरंटाईन होऊन करावे लागतील. मग त्यांचे नमुने देखील जीनोम सिक्वेंसींगसाठी पाठविले जातील.
आरोग्य मंत्रालयाच्या मते अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचे एकापेक्षा जास्त प्रकार सक्रिय आहेत. यापैकी कोरोनाचा यूकेतील प्रकार 86 देशांमध्ये, दक्षिण आफ्रिकेतील प्रकार 44 देशांमध्ये आणि ब्राझीलमधील प्रकार 15 देशांमध्ये सक्रिय आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसचे हे तीन प्रकार सामान्य कोविड -19 पेक्षा वेगाने संक्रमित झाले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता आरोग्य मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया जारी केली आहे, जी भारतात येणार्या सर्व प्रवाशांना लागू होईल. या एसओपीचा दुसरा भाग यूके, युरोप आणि मि़डल ईस्ट येथून येणाऱ्या प्रवाशांना लागू केला जाईल.