श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर येथे असणाऱ्या दुर्गा नाग  या भागात का ढाब्यावर काम करणाऱ्या व्यक्तीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेनंतर या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखलही करण्यात आल्याचं कळत आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यानं गोळीबार केलेल्या ठिकाणापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये 23 देशांतील नेतेमंडळी/ राजदूत  थांबल्याचंही म्हटलं जात आहे.


टीआरएफनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, ढाब्याचा मालक हा काश्मीरमधील लोकशाही बदलांचा समर्थक सल्याचं कारणही त्यांच्याकडून पुढं करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.


जम्मू काश्मीर भागात दर दिवसाआड पाकिस्तानच्या कुरापती किंवा दहशतवादी कारवाया सुरुच असतात. पण, सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही मंडळी थांबलेल्याच स्थळानजीक ही घटना घडल्यामुळं या घटनेकडे अधिक गांभीर्यानं पाहिलं जात आहे. काही युरोपीय देश आणि ओआयसीच्या देशांतील राजकीय नेतेमंडळींचा एक समूह सध्या जम्मू काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांनंतरच्या परिस्थितीचा आढावा ही मंडळी घेणार आहेत.


In Pics : कडाक्याच्या थंडीमुळे काश्मीरमधील 'दल सरोवर गोठलं',तापमानानं तोडला गेल्या 30 वर्षाचा रेकॉर्ड


केंद्र सरकारनं 2019 च्या ऑगस्ट महिन्यात अनुच्छेद 370 हटवण्याचा निर्णय घेत, जम्मू काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली. दरम्यान केंद्राच्या या निर्णय़ानंतर जम्मू काश्मीरचा दौरा करणारं हे तिसरं प्रातिनिधीक मंडळ ठरत आहे.